Rohit Sharma on Pollution : मुंबईतील प्रदूषणाविषयी रोहितने व्यक्त केली चिंता

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहीत शर्माची एक इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाली आहे

87
Rohit Sharma on Pollution : मुंबईतील प्रदूषणाविषयी रोहितने व्यक्त केली चिंता
Rohit Sharma on Pollution : मुंबईतील प्रदूषणाविषयी रोहितने व्यक्त केली चिंता

श्रीलंके विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ सोमवारी मुंबईत पोहोचला, त्यानंतर कर्णधार रोहित शर्माची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाली आहे. ‘यह क्या हो गया?’ म्हणत रोहीतने प्रदूषणामुळे काळी झालेली हवा दाखवली आहे. (Rohit Sharma on Pollution)

मुंबईतील प्रदूषणाबद्दल वेगळं बोलायला नको. अलीकडे शहरातील बांधकामं आणि गाड्यांमुळे होणारं प्रदूषण यांची चर्चा होतेच होते. त्यातच आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहीत शर्माची एक इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाली आहे. रोहीत स्वत: मुंबईकर आहे. आणि श्रींलकेविरुद्धच्या सामन्यासाठी तो मुंबईत आला तेव्हा त्यालाही हवेतील हे प्रदूषण जाणवलं.

(हेही वाचा : Ganeshotsav: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जानेवारीपासूनच महापालिका तयारीला लागणार)

विमानातून रोहीतने बाहेरचा एक एऱियल फोटो काढला आहे. आणि त्यात आकाशाच्या खालोखाल दाट आणि काळ्या रंगाचं धुरकं दिसत आहे. हे अर्थातच हवेतील प्रदूषण आहे. या फोटोवर रोहीतने ‘मुंबई, यह क्या हो गया?’ असे शब्द लिहिले आहेत. विश्वचषकाच्या निमित्ताने रोहीत सगळीकडे फिरतोय. आणि मुंबईपासून तो दूर आहे. भारतीय संघाचा बांगलादेश विरुद्धचा सामना पुण्यात झाला तेव्हा रोहीत मुंबईत आला होता. पण, आता विमानातून शहराचं हे रुप बघितल्यावर रोहीतला धक्का बसला. भारतीय संघ येत्या रविवारी २ नोव्हेंबरला मुंबईत वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंकेबरोबर सामना खेळणार आहे. आधीचे ६ पैकी ६ सामने जिंकून भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आणि विजयाची ही मालिका कायम राखण्याचाच भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.