वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिसांनी बी. के. सी. मधील भारत डायमंड बोर्स येथे कार्यालय असलेल्या हिरे उद्योगातील प्रमुख कंपनी जे. बी. अँड ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तक्रारीनंतर तपास सुरू केला आहे. कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे गेल्या चार महिन्यांत 5.62 कोटी रुपयांचे हिरे गायब झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
बी. के. सी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरे व्यापारी संजय शाह (५५) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रशांत शाह, विशाल शाह आणि निलेश शाह हे तिघेही त्यांच्या हिऱ्यांच्या कंपनीतील कर्मचारी होते. शाह यांची कंपनी हिरे विकणे, ऑर्डर आणि डिलिव्हरी हाताळणे या व्यवसायात कार्यरत आहे. त्यांनी प्रशांत शाह, विशाल शाह आणि निलेश शाह या आपल्या तिन्ही कर्मचाऱ्यांवर हिऱ्यांच्या वितरणाची जबाबदारी सोपवली होती, मात्र वितरणासाठी दिलेले हिरे त्यांनी गुप्तरित्या परस्पर विकले.
(हेही वाचा – LPG Price Hike : ऐन दिवाळीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या )
त्यानंतर नेहमीच्या साठ्यातील हिरे गहाळ झाले असून त्या हिऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत हे जेव्हा संजय शाह यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी या तिघा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी हिऱ्याची डिलिव्हरी झाली नाही, असे कळल्यामुळे धक्का बसला.
बी.के.सी. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला असता प्रशांत, विशाल आणि निलेश यांनी परस्पर हिरे विकल्याचे तपासात उघडल झाले. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community