पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज सायंकाळी 4:30 वाजता दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर भारताच्या आशियाई पॅरा गेम्सच्या टिमशी संवाद साधतील. आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल पंतप्रधान त्यांचे अभिनंदन करतील. यामुळे त्यांना भविष्यातील स्पर्धांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये भारताने 29 सुवर्ण पदकांसह एकूण 111 पदके जिंकली आहेत. आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये जिंकलेल्या पदकांची एकूण संख्या मागील सर्वोत्तम कामगिरीपेक्षा (2018 मध्ये) 54% जास्त आहे आणि जिंकलेली 29 सुवर्णपदके 2018 मध्ये जिंकलेल्या सुवर्णपदकांच्या संख्येपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : हसन मुश्रीफांच्या गाडीची मराठा आंदोलकांकडून तोडफोड; दोघेजण ताब्यात)
या कार्यक्रमाला खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, भारतीय पॅरालिम्पिक समिती आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community