Shreyas Iyer : मुंबईत श्रेयस अय्यरचा आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सराव

126
Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता
Ind vs Eng Test Series : श्रेयस अय्यर उर्वरित तीनही कसोटींना मुकण्याची शक्यता

श्रीलंकेविरुद्ध संघात बदल होणार नाहीत, असं सुतोवाच भारतीय संघ प्रशासनाने केलं आहे. त्याचवेळी घरच्या मैदानावर खेळत असूनही श्रेयस अय्यरवर दडपण असणार आहे. आखूड टप्प्याच्या चेंडूंनी या स्पर्धेत त्याला सतावलंय बुधवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने नेट्समध्ये जोरदार सराव केला. पण, सगळ्याचं लक्ष चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरवरच होतं. मंगळवारचं हे सराव सत्र वैकल्पिक होतं.  रोहीत, विराट तसंच शुभमन यांनी सत्राला दांडी मारली होती. (Shreyas Iyer )

 श्रेयस अय्यर सगळ्यात आधी पॅड्स बांधून नेट्समध्ये हजर होता. त्याने दोन तास सराव तर केलाच. आणि खास करून आखूड टप्प्याच्या चेंडूवर कसं खेळायचं याची तयारी करताना तो दिसला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना श्रेयस मोठी धावसंख्या उभारू शकलेला नाही. उलट काही वेळा संघाला गरज असताना त्याने विकेट फेकली आहे. आणि या प्रत्येक वेळी आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याची भंबेरी उडालेली दिसली. खांद्याच्या वर उसळलेल्या चेंडूवर प्रत्येक वेळी तो बांद झालेला आहे. त्यामुळे नेट्समध्ये सुरुवातीला श्रेयसने स्थानिक गोलंदाजांबरोबर सराव केला. आणि थोड्याच वेळात त्याने थ्रो-डाऊन तज्जांबरोबर आखूड चेंडू खेळायला सुरुवात केली. डी राघवेंद्रा, श्रीलंकेचा डावखुरा गोलंदाज सेनेविरत्ने यांनी श्रेयसवर वेगवेगळ्या टप्प्याच्या चेंडूंचा मारा केला. (Shreyas Iyer )

(हेही वाचा :Narendra Modi: आशियाई पॅरा गेम्सच्या खेळाडूंशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार)

फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड जातीने श्रेयसचा सराव पाहण्यासाठी उपस्थित होते. श्रेयसने हूक आणि पूलच्या फटक्यांवर लक्ष केंद्रीत केलं होतं. आणि समाधानाची गोष्ट म्हणजे यातले काही फटके त्याने सीमारेषेपारही टोलवले. वानखेडे स्टेडिअम हे त्याचं घरचं मैदान आहे. त्यामुळे निदान इथं तरी त्याची बॅट परजेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. श्रेयसच्या खराब कामगिरीनंतर त्याचाच मुंबईकर साथीदार सुर्यकुमार यादवच्या नावावची चर्चा श्रेयसचा बदली खेळाडू म्हणून होऊ लागली आहे. पण, के एल राहुलने पत्रकार परिषदेत संघात मोठे बदल होणार नाहीत, असं सुतोवाच केलं आहे. शिवाय हार्दिक पांड्या खेळत नाहीए. त्यामुळे लगेच आताच संघात बदल करण्याची गरजही नाही. मंगळवारच्या सराव सत्रात भारतीय गोलंदाजांनीही विश्रांती घेणंच पसंत केलं. अश्विन, जाडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी गोलंदाजी पेक्षा फलंदाजीचाच सराव अधिक केला. तर इशान किशन, के एल राहुल आणि सुर्यकुमार यादव यांनी फलंदाजीचा नियमित सराव केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.