देशातील सर्व डॉक्टरांची नॅशनल मेडिकल असोसिएशनद्वारे नोंदणी (Unique ID) केली जाणार असून त्यांना या नोंदणीच्या आधारावर युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक (Unique dentification number) दिला जाणार आहे. २०२४ च्या अखेरीस ही योजना लागू होण्याची शक्यता नॅशनल मेडिकल असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. या नोंदणीत वैद्यकीय पात्रता, शिष्यवृत्ती आणि डॉक्टरांच्या इतर अभ्यासक्रमांचे तपशीलांची नोंद अद्ययावत करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरातील डॉक्टरांची अशा पद्धतीने नोंदणी करून त्यांना युनिक नंबर दिल्यामुळे डॉक्टरांची माहिती मिळणे नागरिकांना सहज शक्य होऊ शकते, अशी माहिती देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय नियामकांतर्गत असलेल्या नीतिशास्त्र आणि वैद्यकीय नोंदणी मंडळाचे डॉ. योगेंद्र मलिक यांनी सांगितले.
(हेही वाचा – Maratha Reservation : सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा; मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांची विनंती)
नॅशनल मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील ४ खासगी आणि ४ सरकारी अशा आठ महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या मूल्यमापन प्रणालीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आता या प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी समुपदेक आणि मूल्यांकनकर्ते यांच्यामध्ये विचारविनिमय सुरू आहे.
युनिक आयडी प्रक्रिया…
युनिक आयडी हा बँक खात्यासारखा असेल, ज्यामध्ये डॉक्टरांची सर्व माहिती साठवली जाईल. एन. एम. सी. अंतर्गत (National Medical Association)असलेली मंडळे, डॉक्टरांना कामावर ठेवणाऱ्या संस्था किंवा वैद्यकीय महाविद्यालये जिथे ते पुढील शिक्षणासाठी जातात आणि लोकांना गरजेनुसार वेगवेगळ्या स्तरांची माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी माहिती योगेंद्र मलिक यांनी दिली आहे. या प्रकल्पाबाबत त्यांनी सांगितले की, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर महाविद्यालये आणि डॉक्टरांची खरी माहिती मिळवण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. पुढील ६ महिन्यांत नॅशनल मेडिकल आयोगाकडून यावर प्रायोगिक तत्त्वावर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मलिक यांनी दिली.
डॉक्टरांना फायदा …
नवीन नोंदणीमुळे डॉक्टरांना अनेक राज्यांमध्ये प्रॅक्टीस करण्यासाठी परवाने घेण्याची परवानगी मिळेल. सध्याची भारतीय वैद्यकीय नोंदणी तयार करण्यासाठी राज्य वैद्यकीय परिषदांच्या आकडेवारीचा वापर करण्यात येतो. याकरिता नवीन नोंदणी क्रमांकाची मदत होईल. या नोंदणीअंतर्गत नागरिकांना नोंदणी क्रमांक, नोंदणीची तारीख, कामाचे ठिकाण, वैद्यकीय पात्रता, विशेषत्व, शिक्षण घेतलेले विद्यापीठ आणि उत्तीर्ण होण्याचे वर्ष यासारखी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल. ही नोंदणी दर ५ वर्षांनी अद्ययावत करणे आवश्यक असल्याची माहिती यावेळी डॉ. योगेंद्र मलिक यांनी दिली.