Maratha Reservation साठी मागील ८ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसले आहेत, सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सर्व पक्षीय बैठक घेण्यात आली, मात्र या बैठकीतील ठरावावर जरांगे पाटील यांनी असमाधान व्यक्त करत, थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे.
सरकारला अजून किती वेळ द्यायचा?
सर्व पक्षीय बैठकीत राज्यातील ३२ आमदार आणि विविध पक्षातील नेते उपस्थित होते. या सर्वांचा उपस्थितीत मराठा समाजाला टिकणारे Maratha Reservation देण्याच्या संदर्भात ठराव करण्यात आला. मात्र त्यासाठी अधिकचा वेळ द्यावा लागणार आहे. तोवर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती या बैठकीत करण्यात आली. यावर जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मागील ७-८ दिवसांपासून मी उपोषण करत आहे आणि सरकार आता वेळ मागत आहे. सरकारला अजून किती वेळ द्यायचा? मराठा समाजाची सहनशीलता संपत चालली आहे. सरकारला वेळ द्यायचा कि नाही हे मी समाजाशी बोलून ठरवेन, मात्र बुधवारपासूनच मी पाणी पिणे सोडून देणार आहे. जोवर मला बोलता येत आहे, तोवर माझ्याशी चर्चा करा, असे जरांगे पाटील म्हणाले.
(हेही वाचा Maratha Reservation : सरकारच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा; मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांची विनंती)
आता उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीसांनी Maratha Reservation वरील चर्चेसाठी यावे, रस्त्यांवर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील. पण आज संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे, मग बघू मराठ्यांना कसे आरक्षण देत नाहीत, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.
Join Our WhatsApp Community