P V Sindhu Injury Update : पी व्ही सिंधूच्या दुखापतीविषयी मोठा अपडेट

पी व्ही सिंधू आपल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणखी काही आठवडे बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहणार आहे

111
P V Sindhu : उबेर चषकातून पी व्ही सिंधूची माघार
  • ऋजुता लुकतुके

पी व्ही सिंधू आपल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणखी काही आठवडे बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहणार आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पी व्ही सिंधूने गुडघ्याच्या दुखापतीमुळे काही आठवडे कोर्टपासून दूर राहवं लागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. २८ वर्षीय सिंधूच्या ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याच्या प्रयत्नांनाही हा एक धक्का बसला आहे. (P V Sindhu Injury Update)

गेल्याच आठवड्यात फ्रेंच खुली सुपरसीरिज खेळताना सिंधूला दुसऱ्या फेरीचा सामना या दुखापतीमुळे अर्धवट सोडावा लागला होता. थायलंडच्या सुपानिदा गेटथाँग हिच्या विरुद्ध पहिला गेम जिंकलेला असताना आणि दुसऱ्या गेममध्ये १-१ अशी बरोबरी असताना सिंधूने सामना सोडला. त्यानंतर ट्विटरवर गुडघा दुखावला असल्याचं तिने सांगितलं होतं. (P V Sindhu Injury Update)

आता एका आठवडयानंतर या दुखापतीचं स्वरुप उघड झालं आहे आणि हा अपडेटही सिंधूने ट्विटवरच चाहत्यांना कळवला आहे. (P V Sindhu Injury Update)

पुन्हा कोर्टवर परतताना नवी ताकद घेऊन आणि सर्वोत्तम खेळ करण्याच्या इराद्यानेच येईन, असं सुरुवातीलाच सिंधूने नमूद केलंय आणि त्यानंतर अधिकृत लेटरहेडवर तिने दुखापतीविषयी माहिती दिली आहे. (P V Sindhu Injury Update)

(हेही वाचा – King of Cricket : आपल्या ‘विराट’ कारकीर्दीचा हा प्रवास कोहलीने कसा शक्य केला?)

‘काही स्कॅन केल्यानंतर गुडघा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचं समजलं आहे. त्यामुळे डॉक्टरांनी काही आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मी सराव पुन्हा सुरू करू शकेन. आताची विश्रांती ही ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रीत करायला मला उपयोगी पडेल, असंच मी समजते,’ असं सिंधूने या संदेशात लिहिलं आहे. (P V Sindhu Injury Update)

खरंतर सिंधू या हंगामात खराब फॉर्मशी झगडतेय. काही महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये ती क्रमवारीत सतराव्या क्रमांकापर्यंत घसरली होती. आर्टिक तसंच डेन्मार्क खुल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्यानंतर मागच्या मंगळवारी ती पुन्हा एकदा पहिल्या दहांत पोहोचली. आणि मागोमाग हा दुखापतीचा धक्का तिला बसला आहे. पुढच्या दोन महिन्यांत कोरिया मास्टर्स, जपान सुपर, चायना मास्टर्स तसंच सय्यद मोदी खुली स्पर्धा अशा चार महत्त्वाच्या स्पर्धा रंगणार आहेत. तर ऑलिम्पिकसाठीची पात्रता जागतिक क्रमवारीतील स्थानावरून ठरणार आहे. (P V Sindhu Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.