पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली आहे. (Pune SFI ABVP) स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या २ विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ची सभासद नोंदणी सुरू होती. या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या कार्यकर्त्यानी अचानक येऊन एसएफआयच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला असल्याचा आरोप संघटनेचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी केला आहे. (Pune SFI ABVP)
(हेही वाचा – Chitra Wagh : सुप्रियाताई, तुमच्या खोट्या ‘माणुसकी’चा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचा सुळेंवर घणाघात)
सोशल मीडियावर आलेल्या या व्हिडिओनुसार, एसएफआयच्या कार्यकर्त्याला अभाविपचे कार्यकर्ते खाली पाडून मारताना दिसत आहेत. एका अभाविपच्या कार्यकर्त्याला एसएफआयचे कार्यकर्ते काठीने मारहाण करतांना दिसत आहेत. दोन्ही बाजूने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. (Pune SFI ABVP)
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या संघटनेकडून विद्यापिठात संघटनेची सदस्य नोंदणी सुरू होती. त्या वेळी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. अभाविपने सदस्य नोंदणीत अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला. (Pune SFI ABVP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community