दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. (SSC HSC Exam 2024) फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याच्या तारखा महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे. (SSC HSC Exam 2024)
(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway : मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, द्रुतगती मार्गावर पुन्हा ब्लॉक)
इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 ते गुरुवार, 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे. इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. (SSC HSC Exam 2024)
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे. दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (SSC HSC Exam 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community