Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही; जरांगे यांचा एल्गार

मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार घेणार नाही. मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही. मला माझ्या जातीवर अन्याय सहन होणार नाही, असे मनोज जरांगे यानी म्हटले आहे.

161
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही; जरांगे यांचा एल्गार
Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही; जरांगे यांचा एल्गार

मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. (Maratha Reservation) आतापर्यंत अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे. शासनाने पुन्हा पुन्हा आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन सरकारने आरक्षणासाठी प्रयत्नांची दिशाही निश्चित केली आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याची भूमिका पुन्हा मनोज जरांगे यांनी घेतली आहे. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Cash For Query Case : हिरानंदानी, देहादराय यांची उलटतपासणी करण्यात यावी; महुआ मोईत्रा यांची मागणी)

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सरकारवर टीका केली. जरांगे म्हणाले की, ”राज्य सरकारविरोधात जनतेत रोष आहे. आरक्षण मिळेपर्यंत आता पाण्याला हात लावणार नाही. मराठा आरक्षणाच्या लढाईतून मी माघार घेणार नाही. मी पाणी सोडले, आता मी पाणी घेणार नाही. मला माझ्या जातीवर अन्याय सहन होणार नाही. जाणून बुजून मराठा तरुण कार्यकर्त्यांवर सरकारने खोट्या केसेस दाखल केल्या आहेत.” प्रशासन सरकारच ऐकून आंदोलकांचा छळ करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. (Maratha Reservation)

मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. असे आंदोलनाचे सहा-सात टप्पे होणार आहेत. या एखाद्या टप्प्यात सरकारला आरक्षण द्यावेच लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. मनोज जरांगे यांनी ‘मराठा समाजाचा किती अंत पाहता’, असा उलट सवाल केला. सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर नाराजी व्यक्त केली. (Maratha Reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.