Air Pollution In Mumbai : बेस्टच्या बसेसवरही बसवणार हवा शुध्दीकरणाची यंत्रणा

मुंबईतील हवेतील धुळीच प्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून मुंबईतील तब्बल ३५० बेस्ट बसेसवर व्हेहिकल माऊंटेंड स्पिंकर्स तंत्रज्ञान बसवण्यात येणार आहे.

257
Air Pollution In Mumbai : बेस्टच्या बसेसवरही बसवणार हवा शुध्दीकरणाची यंत्रणा
Air Pollution In Mumbai : बेस्टच्या बसेसवरही बसवणार हवा शुध्दीकरणाची यंत्रणा

मुंबईतील हवेतील धुळीच प्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असून मुंबईतील तब्बल ३५० बेस्ट बसेसवर व्हेहिकल माऊंटेंड स्पिंकर्स तंत्रज्ञान बसवण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात १५० बसेसवर या तंत्राचा वापर करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात २०० बसेसवर या तंत्राचा वापर करत याबाबतच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले. याशिवाय बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक बसेसवरही अशाप्रकारची यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे ताफ्यात येण्यापूर्वीच या बसेसवर फिल्टरची यंत्रणा बसवली जाण्याचा विचार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. (Air Pollution In Mumbai)

मुंबई शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी महापालिका मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलतांना ही माहिती दिली. याप्रसंगी शिवसेना खासदार व संसदेतील शिवसेना पक्षाचे गटनेते राहुल शेवाळे, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेनेच्या माजी नगरसेविका व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव, माजी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, माजी नगरसेवक सुनील मोरे, आत्माराम चाचे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना केसरकर, यांनी देशातील इतर शहरांच्या तुलनेत धुळीच्या प्रदुषणात नियंत्रण आणण्यात मुंबई शहर प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. (Air Pollution In Mumbai)

आयआयटीने धुळीचे प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी काही तंत्रज्ञान निश्चित केले असून त्याचा वापर करून मुंबईतील प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईतील धुळीच्या प्रदुषणावर पर्यावरण विभागाच्यावतीने नियंत्रण ठेवले जात जात असून महापालिका आयुक्तही लक्ष ठेवून आहेत. बांधकामाच्या ठिकाणी उंच पत्रे उभारुन धुळ बाहेर पसरणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक तत्वे बनवली आहे. त्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी १५ दिवसांची मुदत तर अंमलबजावणीसाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. त्यामध्ये पाण्याचा मारा करण्यासाठी स्प्रिंकर्स बसवणे तसेच फॉग गन आदींचा वापर करण्याच्या सूचना केला आहे. (Air Pollution In Mumbai)

वाहनांमुळे धुराचे प्रदूषण अधिक होत असल्याने अनेक ठिकाणी दाटीवाटीने वसलेल्या वस्ती तसेच वाहनांची कोंडी होणारी ठिकाणी आदी दहा ठिकाणे निश्चित केली आहे. या दहा ठिकाणी व्हर्च्युअल चिमणी बसवल्या जाणार असून ज्याद्वारे त्या भागातील हवा शुध्द केली जाणार आहे. (Air Pollution In Mumbai)

(हेही वाचा – ED : नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजमधील ५३८ कोटींची मालमत्ता जप्त)

मुंबईतील सहा उद्यानांमध्ये हवा शुध्दीकरण यंत्रे

मुंबईतील सहा उद्यानांच्या ठिकाणी हवा शुध्दीकरणाची यंत्रे बसवली जाणार आहेत. यासाठी चेंबूरचे डायमंड गार्डन, मानखुर्द गार्डन, दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क, भायखळा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबाग, स. का पाटील उद्यान, वडाळा भक्तीपार्क आदी सहा ठिकाणी हवा शुध्दीकरणाची यंत्रे बसवली जाणार आहेत. याशिवाय वायू नावाची स्ट्रिट लाईट बसवली जाणार असून यासाठी ५० जागा निश्चित केल्या जाणार आहेत. (Air Pollution In Mumbai)

मुंबईत विविध ठिकाणी सिमेंट व रेती मिक्स करणाऱ्या रेडीमिक्सचे प्लांट असून या प्लांटमधून होणारे प्रदुषण रोखण्यासाठी त्यांना नोटीस देण्यात आल्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. (Air Pollution In Mumbai)

बेकरी प्रॉडक्टही रडारवर

बेकींग प्रॉडक्ट बनवणाऱ्या बेकरींमध्ये लाकडे जाळली जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लायवूडचा वापर केला जात आहे. यापासून निघणारा धूर हा धोकादायक तथा घातक असून या बेकरी प्रॉडक्टपासून होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी त्यांना सूचना केल्या असून त्यांना त्याबाबतच्या यंत्र सुचित केल्यास त्यांना ही यंत्रणा बसवण्यास बंधनकारक केले जाईल आणि ती यंत्रणा त्यांना स्वखर्चाने बसवण्यास भाग पाडले जाईल. त्याप्रमाणे हवामान खात्याप्रमाणे हवा प्रदुषण नियंत्रण कक्ष बसवण्याचा विचार असल्याचे दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले. (Air Pollution In Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.