ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याचा सखोल तपास आवश्यक आहे. हा देशातील तरुणाई नासवण्याचा प्रकार आहे. या गुन्ह्यांच्या मुळाशी जायचे आहे. असे सांगून तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी ललितसह दोन्ही आरोपींना चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Lalit Patil)
ललित पाटील (Lalit Patil) सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला पुणे पोलिसांची कोठडी मिळाली आहे. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. पुणे पोलिसांकडून ललित पाटीलच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ललित पाटीलच्या वकिलांनी याला आक्षेप घेतला. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं.
(हेही वाचा :Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद)
ललित पाटील ससुन रुग्णालयात असताना त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा ललितच्या वकिलांनी दावा केला.तसेच ललित पाटील आजारी असून त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं सांगत ललित पाटीलच्या वकिलांकडून पोलीस कोठडीला विरोध करण्यात आला. ललित साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असताना अंधेरी न्यायालयात आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा केला आहे. यावेळीही ललितचे वकील संदीप बाली यांनी आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करीत त्याच्या जिवाला धोका असल्याचा पुनरुच्चार केला. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ललितला कुणापासून धोका आहे, असे विचारले असता बाली यांनी ‘संबंधित ॲथॉरिटी’ असा शब्दप्रयोग केला. त्यावर न्यायालयाने ललित पुण्यात सुखरूप पोहोचला आहे ना, अशी टिपणी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community