आगामी दिवाळी, छटपूजा या सणांसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्याप्रमाणावरील गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने अतिरिक्त ७० उत्सव विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू झाले आहे. (Special Trains)
ट्रेन क्रमांक ०९०२५ विशेष उत्सव ट्रेन ६ नोव्हेंबर २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ (८ फेऱ्या) पर्यंत दर सोमवारी सकाळी ८.४० वाजता वलसाड येथून सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९०२५ उत्सव विशेष एक्स्प्रेस ७ नोव्हेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ (८ फेऱ्या) पर्यंत दर मंगळवारी दुपारी २.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि वलसाड येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल. दोन्ही दिशेच्या उत्सव विशेष गाड्या वलसाड, भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्थानकांवर थांबणार आहेत.
ट्रेन क्रमांक ०९०५७ उत्सव विशेष एक्स्प्रेस ३ नोव्हेंबर २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ (१८ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवारी आणि रविवारी संध्याकाळी ७.४५ वाजता उधना येथून सुटेल आणि मंगळुरू जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.१० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९०५८ उत्सव विशेष एक्स्प्रेस ४ नोव्हेंबर २०२३ ते १ डिसेंबर २०२४ (१८ फेऱ्या) पर्यंत मंगळुरू जंक्शन येथून दर शनिवारी आणि सोमवारी रात्री ९.१० वाजता सुटेल आणि उधना येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल.
(हेही वाचा : Sachin Tendulkar Statue : सचिन तेंडुलकरला जेव्हा त्याचा जुना चाहता भेटतो…)
इंदूर-पुणे साप्ताहिक विशेष
ट्रेन क्रमांक ०९३२४ इंदूर-पुणे साप्ताहिक विशेष १ नोव्हेंबर २०२३ ते २७ डिसेंबर २०२३ (९ फेऱ्या) पर्यंत दर बुधवारी सकाळी ११.१५ वाजता इंदूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी मध्य रात्री ३.१० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०९३२३ उत्सव विशेष एक्स्प्रेस २ नोव्हेंबर २०२३ ते २८ डिसेंबर २०२३ (९ फेऱ्या) पर्यंत पुणे येथून दर गुरुवारी ०५.१० वाजता सुटेल आणि इंदूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. इंदूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला इंदूर, देवास, उज्जैन, नागदा, रतलाम, गोध्रा, वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, वसई रोड, कल्याण, लोणावळा आणि पुणे स्थानकांवर थांबणार आहे.
हेही पहा –