Ind vs Sl : इंग्लंड वि, श्रीलंका सामन्यापूर्वी सुर्यकुमार बनला कॅमेरामन, पण तुम्ही त्याला ओळखलंत का?

क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमातही भारतीय संघ मजेसाठी थोडा वेळ काढत आहे आणि बीसीसीआयच खेळाडूंचे असे मजेशीर व्हीडिओ पोस्ट करत आहे. ताज्या व्हीडिओत सुर्यकुमार यादव कॅमेरामनच्या भूमिकेत आहे. 

104
Ind vs Sl : इंग्लंड वि, श्रीलंका सामन्यापूर्वी सुर्यकुमार बनला कॅमेरामन, पण तुम्ही त्याला ओळखलंत का?
Ind vs Sl : इंग्लंड वि, श्रीलंका सामन्यापूर्वी सुर्यकुमार बनला कॅमेरामन, पण तुम्ही त्याला ओळखलंत का?
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमातही भारतीय संघ मजेसाठी थोडा वेळ काढत आहे आणि बीसीसीआयच खेळाडूंचे असे मजेशीर व्हीडिओ पोस्ट करत आहे. ताज्या व्हीडिओत सुर्यकुमार यादव कॅमेरामनच्या भूमिकेत आहे. (Ind vs Sl)

श्रीलंके विरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ सध्या मुंबईत आहे आणि सामन्यापूर्वी मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादवने हातात बॅट नाही तर कॅमेरा धरला होता. या नव्या भूमिकेत त्याने मरिनड्राईव्ह इथं चाहत्यांशी संवादही साधला. गंमत म्हणजे, अनेकांनी त्याला ओळखलंच नाही आणि न ओळखणाऱ्यांमध्ये एक होता रवींद्र जाडेजा. (Ind vs Sl)

‘मी आज कॅमेरामनच्या भूमिकेत असणार आहे आणि आपण क्रिकेट विषयी बोलणार आहोत. रस्त्यावर काहींशी गप्पा मारणार आहोत,’ असं व्हीडिओत सुरुवातीला सुर्यकुमार म्हणतो. त्याने पूर्ण बाह्यांचा शर्ट घातलाय. डोळ्यावर चश्मा आहे. तसंच चेहऱ्यावर त्याने मास्क लावलाय आणि डोक्यावर टोपी. त्यामुळे खरंच लोकांनी त्याला ओळखलं नाही. (Ind vs Sl)

कॅमेरामनच्या भूमिकेत असलेल्या सुर्यकुमारला एका चाहत्याने कॉम्प्लिमेंटही दिली. सुर्यकुमार हा चांगला फलंदाज आहे आणि वानखेडे मैदानावर तो खेळेल अशी आशा आहे, असं हा चाहता म्हणाला. (Ind vs Sl)

(हेही वाचा – Asha Sevika : आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; कारण…)

या व्हीडिओच्या शेवटी सुर्यकुमार मास्क काढून टाकून आपलं खरं रुप चाहत्यांना दाखवतो आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर फोटोही काढतो. या विश्वचषकात सुर्यकुमार यादवने दोन सामन्यांत ५१ धावा केल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध त्याची ४९ धावांची खेळी निर्णायक ठरली होती. (Ind vs Sl)

तर भारतीय संघ ६ पैकी ६ सामने जिंकून गुणतालिकेत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. अव्वल स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. त्यांचे ७ सामन्यांतून भारता इतकेच १२ गुण झाले आहेत. पण, त्याची धावगती जास्त आहे. श्रीलंके विरुद्धचा सामना जिंकून भारताला पुन्हा अव्वल जागी जाण्याची संधी आहे. (Ind vs Sl)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.