पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ५ हजार ८६३ सदनिकांसाठी म्हाडाकडे ५९ हजार ७६६ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. या घरासाठी सोडत २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. (MHADA)
म्हाडा पुणे विभागाने गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील ४३१ सदनिका, १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील ३४४ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील २ हजार ४४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २ हजार ४४५ सदनिका अशा एकूण ५ हजार ८६३ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी ५ सप्टेंबर २०२३ पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.
(हेही वाचा :Ind vs Sl : इंग्लंड वि, श्रीलंका सामन्यापूर्वी सुर्यकुमार बनला कॅमेरामन, पण तुम्ही त्याला ओळखलंत का?)
अर्ज करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत ३१ ऑक्टोबर रोजी संपली. या मुदतीत म्हाडाकडे ७७ हजार २८० जणांनी अर्ज केले असून, त्यापैकी ५९ हजार ७६६ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे अनामत रक्कम भरलेलेच म्हाडाच्या सोडतीसाठी पात्र ठरले आहेत. (MHADA )
अर्जाची प्रारूप यादी
८ नोव्हेंबर २०२३
हरकती नोंदवण्याची मुदत
११ नोव्हेंबर २०२३
अर्जाची अंतिम यादी :
२० नोव्हेंबर २०२३
सोडत
२४ नोव्हेंबर २०२३
हेही पहा –
Join Our WhatsApp Community