Anupam Mittal Net Worth : ‘शार्क टॅंक इंडिया 2’चे परीक्षक आणि यशस्वी उद्योजक अनुपम मित्तल यांची किती आहे संपत्ती

शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या हंगामात सहभागी झालेले 51 वर्षीय भारतीय उद्योजक आणि गुंतवणूकदार अनुपम मित्तल हे लग्न जुळवणारी वेबसाइट Shaadi.com, रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म Makaan.com, एक लघु व्हिडिओ अनुप्रयोग आणि मोबांगो यासह अनेक यशस्वी उपक्रमांचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत.

181
Anupam Mittal Net Worth : 'शार्क टॅंक इंडिया 2'चे परीक्षक आणि यशस्वी उद्योजक अनुपम मित्तल यांची किती आहे संपत्ती
Anupam Mittal Net Worth : 'शार्क टॅंक इंडिया 2'चे परीक्षक आणि यशस्वी उद्योजक अनुपम मित्तल यांची किती आहे संपत्ती

‘शार्क टॅंक इंडिया 2’ या बिझनेस रियालिटी शोची सध्या जोरदार चर्चा आहे. (Anupam Mittal Net Worth) गेल्या वर्षी ‘शार्क टँक इंडिया’ या दूरचित्रवाणी कार्यक्रमाच्या भव्य यशानंतर त्याचे निर्माते या वर्षाच्या सुरुवातीला ‘शार्क टँक इंडिया-सीझन 2’ घेऊन परतले आहेत. अमेरिकन बिझनेस शो ‘शार्क टँक’ पासून प्रेरित असलेल्या या शोमध्ये महत्त्वाकांक्षी उद्योजक त्यांच्या व्यवसायाच्या कल्पना यशस्वी गुंतवणूकदारांच्या पॅनेलसमोर मांडतात, ज्यांना शार्क म्हणूनही ओळखले जाते. या परीक्षकांनाही प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता आहे. यातील एक यशस्वी उद्योजक ‘अनुपम मित्तल’ यांच्याविषयीही सर्वांना नेहमीच उत्सुकता असते.  (Anupam Mittal Net Worth)

शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या हंगामात सहभागी झालेले 51 वर्षीय भारतीय उद्योजक आणि गुंतवणूकदार अनुपम मित्तल हे लग्न जुळवणारी वेबसाइट Shaadi.com, रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म Makaan.com, एक लघु व्हिडिओ अनुप्रयोग आणि मोबांगो यासह अनेक यशस्वी उपक्रमांचे संस्थापक म्हणून प्रसिद्ध आहेत.

(हेही वाचा – Amitabh Bachchan : जाणून घ्या महानायक बिग बी यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी)

यशस्वी बिझनेसमॅन अनुपम मित्तल यांचा जन्म 23 डिसेंबर 1971 रोजी मुंबई (Mumabi) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाल कृष्ण मित्तल आणि आईचे नाव भगवती देवी मित्तल आहे. मुंबईतील डॉन बॉस्को येथे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर ते पुढील शिक्षणासाठी कॅनडाला गेले. अनुपम मित्तल हे बोस्टन कॉलेज, मॅसेच्युसेट्स, युनायटेड स्टेट्सचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी 1994 ते 1997 पर्यंत ऑपरेशन्स आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये मेजर केले. एमबीए पूर्ण केल्यानंतर अनुपम यांनी पीपल्स ग्रुपची पायाभरणी केली. पीपल्स ग्रुप ही shaadi.com, makaan.com, मौज मोबाइल ॲप आणि पीपल पिक्चर्स या व्यवसायांची मूळ कंपनी आहे. (Anupam Mittal Net Worth)

94 हून जास्त व्यवसायांमध्ये गुंतवणूक

अनुपम मित्तल हे ‘इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’चे (आयएएमएआय) संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष आहेत. ते एच 2 इंडियाचे संस्थापक सह-अध्यक्ष देखील आहेत. अनुपम मित्तल हे एक सक्रीय गुंतवणूकदार आहेत. त्यांनी 94 हून अधिक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे.

185 करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक

अनुपम मित्तल यांनी 4 जुलै 2013 रोजी आंचल कुमार या मॉडेलशी लग्न केले. त्यांना एक एलिसा नावाची सुंदर मुलगी आहे. सध्या ते 185 करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. बिझनेस वीकने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील 50 सर्वांत शक्तिशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश आहे. 2012 आणि 2013 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘इम्पॅक्ट डिजिटल पॉवर 100’ यादीतून भारताच्या डिजिटल इकोसिस्टमसाठीही त्यांना मतदान करण्यात आले. (Anupam Mittal Net Worth)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.