बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान केवळ एका चित्रपटासाठी १०० ते १५० कोटी रुपये मानधन म्हणून घेतो. (Shah Rukh Khan Net Worth) गुरुवारी २ नोव्हेंबरला तो ५८ वर्षांचा झाला आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरुख खानचा क्रमांक चौथा लागतो. त्याची एकूण संपत्ती ७६० मिलियन डाॅलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार ६,३०० कोटी रुपये नेटवर्थ आहे. (Shah Rukh Khan Net Worth)
१४ फिल्मफेअर जिंकणारा अभिनेता
मध्यंतरी बॉलीवूडच्या विरुद्ध जी चळवळ चालली, त्याचा शाहरुख खानला विशेष फटका बसला नाही. त्याचे पठान आणि जवान हे दोन्ही चित्रपट चांगले चालले. शाहरुखने आतापर्यंत सुमारे ९० चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्याने १४ फिल्मफेअर अवॉर्ड्सवर आपलं नाव कोरलं आहे, तसेच इतर अनेक पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. (Shah Rukh Khan Net Worth)
(हेही वाचा – Anupam Mittal Net Worth : ‘शार्क टॅंक इंडिया 2’चे परीक्षक आणि यशस्वी उद्योजक अनुपम मित्तल यांची किती आहे संपत्ती)
शाहरुख खानकडे आहे इकॉनॉमिक्सची डिग्री
शाहरुखचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी नवी दिल्लीत झाला. सुरुवातीची पाच वर्षे तो आपल्या आजी-आजोबांसोबत बंगळुरु येथे राहत होता. त्यानंतर तो आपल्या आई-वडिलांसोबत राहू लागला. सेंट कोल स्कूलमध्ये त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं आणि १९८८ रोजी दिल्ली युनिव्हर्सीटीच्या हंसराज कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये बॅचलर डिग्री घेतली. त्यानंतर तो मुंबईत आला आणि स्वतःच्या कष्टाच्या बळावर बॉलीवूडचा बादशाह झाला.
कोट्यवधींचा मालक आणि कोट्यवधींच्या गाड्या
शाहरुख खानच्या मन्नत या घराची किंमत २०० कोटीपेक्षा अधिक आहे, असा रिपोर्ट सीएमबीसीने दिला आहे. त्याचबरोबर देशात आणि विदेशातही अनेक मालमत्ता त्याच्या नावावर आहेत. लंडन आणि दुबईमध्येही त्याचे स्वतःचे घर आहे. त्याच्याकडे रॉल्स रॉयल, बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, बुगाटी वेरॉन, बीएमडब्ल्यू ७-सीरीज, बीएमडब्ल्यू ६-सीरीज, टोयोटा लॅंड क्रूझर अशा अनेक महागातल्या कार आहेत. (Shah Rukh Khan Net Worth)
इतर माध्यमातूनही पैसे कमावतो
शाहरुख अनेक ब्रांडचे एंडोर्समेंट सुद्धा करतो. प्रत्येक एंडोर्समेंटसाठी तो १० कोटी रुपये घेतो. त्याचबरोबर त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या कंपनीचा वार्षिक टर्नओवर सुमारे ५०० कोटी आहे. शाहरुख टिव्ही शोजमधूनही चांगले पैसे कमावतो. टिव्ही शो होस्ट करण्यासाठी तो प्रत्येक एपिसोडचे २ ते २.५ कोटी रुपये मानधन घेतो. त्याला तुम्ही लग्न किंवा इतर समारंभांमध्ये परफॉर्म करायला बोलवलं, तर तो तुमच्याकडून ४ ते ६ कोटी रुपये घेऊ शकतो.
आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्समध्ये देखील त्याने गुंतवणूक केली आहे. या माध्यमातूनही तो विविध प्रकारे कोट्यवधी रुपये कमावतो. शाहरुख खान हा पुष्कळ श्रीमंत अभिनेता आहे आणि त्याच्याकडे असलेली मालमत्ता म्हणजे त्याच्या कष्टाचे फळ आहे. (Shah Rukh Khan Net Worth)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community