Income Tax Returns : आर्थिक वर्षात 31 ऑक्टोबरपर्यंत 7.85 कोटी विक्रमी प्राप्तिकर परतावे दाखल

131
Notice to Congress: इन्कम टॅक्सकडून काँग्रेसला १७०० कोटींची नोटीस
Notice to Congress: इन्कम टॅक्सकडून काँग्रेसला १७०० कोटींची नोटीस

प्राप्तिकर विभागाने 31 ऑक्टोबरपर्यंत प्राप्तिकर परतावा (आयटीआर) (Income Tax Returns) भरणाऱ्यांची विक्रमी संख्या नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी 31 ऑक्टोबरपर्यंत 7.65 कोटी पेक्षा जास्त आयटीआर दाखल करण्यात आले. जे 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत आर्थिक वर्ष 2022-23 साठी दाखल केलेल्या 6.85 कोटी आयटीआरच्या तुलनेत 11.7% जास्त आहे. तसेच, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंतच्या सर्व मूल्यांकन वर्षांसाठी दाखल केलेल्या आयटीआरची एकूण संख्या 7.85 कोटी आहे. जी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दाखल केलेल्या एकूण 7.78 कोटी आयटीआरच्या तुलनेत, आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

आर्थिक वर्ष 23-24 साठी दाखल केलेल्या 7.65 कोटी आयटीआरपैकी 7.51 कोटी पेक्षा जास्त (Income Tax Returns) आयटीआरची यापूर्वीच पडताळणी करण्यात आली आहे. तसेच, पडताळणी करण्यात आलेल्या 7.51 कोटी आयटीआरपैकी, 31 ऑक्टोबरपर्यंत 7.19 कोटी आयटीआरवर यापूर्वीच प्रक्रिया करण्यात आली आहे. म्हणजे, पडताळणी करण्यात आलेल्या जवळजवळ 96% आयटीआर वर प्रक्रिया करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Anupam Mittal Net Worth : ‘शार्क टॅंक इंडिया 2’चे परीक्षक आणि यशस्वी उद्योजक अनुपम मित्तल यांची किती आहे संपत्ती)

कोणतेही आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत विशिष्ट व्यवहार नसलेल्या आणि ज्यांच्या खाते पुस्तकांचे लेखा परीक्षण करणे आवश्यक होते, अशा करदात्यांसाठी, आयटीआर (आयटीआर 7 व्यतिरिक्त) (Income Tax Returns) भरण्याची ही अंतिम तारीख होती.

फॉर्म 10B, 10BB आणि फॉर्म 3CEB यासारखे काही वैधानिक दृष्ट्या (Income Tax Returns) महत्वाचे अर्ज भरण्यासाठी 31 ऑक्टोबर ही अंतिम तारीख होती. 31 ऑक्टोबरपर्यंत 1.44 कोटींहून अधिक विविध प्रकारचे वैधानिक फॉर्म भरले गेले आहेत.

सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांनी (Income Tax Returns) दिलेल्या पाठींब्याबद्दल आयटी विभागाने, कृतज्ञता व्यक्त केली आहे, आणि ज्या करदात्यांनी अद्याप फॉर्म अथवा आयटीआर भरले नाहीत, त्यांनी ते दाखल करावेत, अशी विनंती केली आहे. सर्व करदाते आणि कर व्यावसायिकांनी कर अनुपालन विहित वेळेत करत राहावे, असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.