Glenn Maxwell Injury Update : गोल्फ कार्टवरून पडलेला ग्लेन मॅक्सवेल आगामी सामन्यात खेळणार नाही

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल एका विचित्र अपघातामुळे पुढील काही सामन्यांना मुकणार आहे. निदान इंग्लंड विरुद्ध तरी तो उपलब्ध नसेल आणि ऑस्ट्रेलियन संघासाठी हा मोठा धक्का आहे. 

179
Glenn Maxwell Injury Update : गोल्फ कार्टवरून पडलेला ग्लेन मॅक्सवेल आगामी सामन्यात खेळणार नाही
Glenn Maxwell Injury Update : गोल्फ कार्टवरून पडलेला ग्लेन मॅक्सवेल आगामी सामन्यात खेळणार नाही
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल एका विचित्र अपघातामुळे पुढील काही सामन्यांना मुकणार आहे. निदान इंग्लंड विरुद्ध तरी तो उपलब्ध नसेल आणि ऑस्ट्रेलियन संघासाठी हा मोठा धक्का आहे. (Glenn Maxwell Injury Update)

ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ४ नोव्हेंबरला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही, हे आता स्पष्ट झालंय. सोमवारी गोल्फ खेळाचा आनंद लुटताना त्याला एक विचित्र अपघात झाला. तो गोल्फ कार्टमधून संघाच्या बसकडे येत होता. (Glenn Maxwell Injury Update)

त्याचवेळी कार्ट उलटल्यामुळे ग्लेनची कार्टशी टक्कर झाली. तो तोंडावर आपटला आणि त्याच्या चेहऱ्यावर टेंगूळ आलं असून जागोजागी खरचटलंही आहे. चेहऱ्यावर काही ठिकाणी लागलेला मार थोडा जास्त आहे. ‘ग्लेनला चेहऱ्यावर काही ठिकाणी लागल्यामुळे टेंगूळ आलं आहे. त्यामुळे अशा दुखापतीसाठी संघाचे जे नियम आहेत, त्यानुसार त्याला उपचार घ्यावे लागणार आहेत. तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही,’ असं ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू डोनाल्ड यांनी सांगितलं. (Glenn Maxwell Injury Update)

मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियन संघातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कारण, ॲडम झंपाच्या बरोबरीने तो संघातील दुसरा एकमेव फिरकी गोलंदाज आहे. तर मधल्या फळीतही तो उपयुक्त आणि डाव सांधणारा फलंदाज आहे. नेदरलँड्‌स विरुद्‌ध नवी दिल्लीत त्यानेच ४० चेंडूत शतक झळकावलं होतं. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील हे सर्वात जलद शतक ठरलं. (Glenn Maxwell Injury Update)

(हेही वाचा – Anupam Mittal Net Worth : ‘शार्क टॅंक इंडिया 2’चे परीक्षक आणि यशस्वी उद्योजक अनुपम मित्तल यांची किती आहे संपत्ती)

गंमत म्हणजे एका वर्षात दुसऱ्यांदा ग्लेन मॅक्सवेलला क्रिकेटच्या बाहेरच्या कारणांनी दुखापत झाली आहे. काही महिन्यांपूर्वी वाढदिवस साजरा करताना त्याचा पाय मोडला होता. त्या दुखण्यातून तो अजून पुरता सावरलेला नाही. त्यातच आता ही विचित्र दुखापत त्याला झालीय. (Glenn Maxwell Injury Update)

ऑस्ट्रेलियन संघ नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यानंतर एक आठवड्याच्या सुटीची मजा लुटत आहे. त्यासाठी खेळाडूंनी गोल्फ खेळण्याची योजना बनवली होती. पण, दुर्दैवाने मॅक्सवेलच्या ती अंगलट आली आहे. ऑस्ट्रेलियन संघातील दुखापतींविषयीच्या नियमावलीप्रमाणे मार लागला असेल तर ७ ते ८ दिवस विश्रांती आवश्यक आहे. (Glenn Maxwell Injury Update)

४ तारखेला ऑस्ट्रेलियन संघ अहमदाबाद इथं इंग्लंडशी दोन हात करणार आहे. तर त्यांचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. आणि या दोन्ही सामन्यांत मॅक्सवेल खेळण्याची शक्यता कमीच आहे. (Glenn Maxwell Injury Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.