२००० रुपयांच्या नोटा आता पोस्टाद्वारे रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ठ प्रादेशिक कार्यालयांना पाठवता येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लोकांना त्यांच्या बँक खात्यात २००० च्या नोटा जमा करण्यासाठी TLR फॉर्मही देणार असल्याचे वृत्त पीटीआयने नुकतेच दिले आहे. (Exchange of 2000 rupees)
यासंदर्भात माहिती देताना आरबीआयचे प्रादेशिक संचालक रोहित पी दास यांनी सांगितले की आम्हा ग्राहकांना २००० रुपयाच्या नोटा विमा उतरवलेल्या पोस्टद्वारे आरबीआयकडे त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी सर्वात सुरक्षित पद्दतीने पाठवण्यास प्रोत्साहित करतो. आता ग्राहकांना २००० रुपयांची नोट बदलण्यासाठी बँकांच्या विशिष्ठ शाखांमध्ये जाण्याची तसेच रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
१९ मे रोजी आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा असलेल्या सार्वजनिक आणि संस्थांना सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंत त्या बदलून किंवा बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते. ही अंतिम मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
(हेही वाचा : Income Tax Returns : आर्थिक वर्षात 31 ऑक्टोबरपर्यंत 7.85 कोटी विक्रमी प्राप्तिकर परतावे दाखल)
बँक शाखांतील दोन्ही ठेव आणि विनिमय सेवा ७ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आल्या होत्या.८ ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांची नोट रिझर्व्ह बँकेच्या१९ कार्यालयांमध्ये समतुल्य रक्कम जमा करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला होता. बँक नोटा जमा किंवा बदली करण्यासाठी १९ आरबीआयच्या अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम येथे कार्यालये आहेत. १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये२००० रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या.
हेही पहा –