ICC World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम

दक्षिण आफ्रिकेचा धडाका या विश्वचषकात इतका मोठा आहे की, न्यूझीलंड सारख्या तुल्यबळ संघाला त्यांनी १९० धावांनी धूळ चारलीय आणि तडाखेबंद फलंदाजी करताना संघाने विश्वचषकात एक विक्रम नावावर केलाय

127
ICC World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम
ICC World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण आफ्रिकेचा धडाका या विश्वचषकात इतका मोठा आहे की, न्यूझीलंड सारख्या तुल्यबळ संघाला त्यांनी १९० धावांनी धूळ चारलीय आणि तडाखेबंद फलंदाजी करताना संघाने विश्वचषकात एक विक्रम नावावर केलाय. (ICC World Cup 2023)

दक्षिण आफ्रिकन संघाला स्पर्धेत एकदा नेदरलँड्स संघाकडून पराभवाचा धक्का बसला. पण, हा एकमेव अपवादात्मक धक्का वगळला तर संघाची स्पर्धेतली कामगिरी तडाखेबंद आहे. संघाचा प्रत्येक विजय मोठा आहे आणि क्विंटन डी कॉक एकटाच इतक्या धावा करतोय जितक्या अख्ख्या संघाच्या होऊ शकतात. (ICC World Cup 2023)

आणि अशा कामगिरीनंतर जे साध्य होतं तेच आफ्रिकन संघाने केलंय. गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याबरोबरच संघाने विश्वचषकातील अनेक विक्रम मोडलेत. ताजा विक्रम आहे तो विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा. (ICC World Cup 2023)

न्यूझीलंड विरुद्ध पुण्यातील सामन्यात आफ्रिकन संघाने तब्बल १५ षटकार लगावले आणि त्याचवेळी एका विश्वचषक स्पर्धेत सगळ्यात जास्त म्हणजे आतापर्यंत ८६ षटकार ठोकण्याचा विक्रम केला. (ICC World Cup 2023)

(हेही वाचा – Income Tax Returns : आर्थिक वर्षात 31 ऑक्टोबरपर्यंत 7.85 कोटी विक्रमी प्राप्तिकर परतावे दाखल)

किवी संघाविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकन संघाने पहिली फलंदाजी करताना ४ गडी बाद ३५७ धावा केल्या. यात क्विंटन डी कॉकने ११४ चेंडूंमध्ये ११३ धावा केल्या. क्विंटन या स्पर्धेत चांगलाच फॉर्मात आहे आणि स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावांही केल्या आहेत. (ICC World Cup 2023)

आतापर्यंत सात सामन्यांत क्विंटनने ५४५ धावा केल्या आहेत त्या चार शतकांच्या मदतीने. त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे १७७ धावा आणि स्ट्राईकरेट आहे ११२ धावांचा. एकूणच आफ्रिकन संघाने या स्पर्धेत आतापर्यंत मिळवलेले विजय हे मोठे आहेत आणि त्यामुळे त्यांचा नेट रनरेट हा अडीचच्या आसपास आहे. तर काल न्यूझीलंडचा संघ ३५४ धावांचा पाटलाग करताना १६७ धावांमध्येच सर्वबाद झाला. त्यामुळे त्यांचा नेट रनरेट कमी होऊन गुणतालिकेत ते ऑस्ट्रेलियाच्याही खाली चौथ्या क्रमांकावर गेले आहेत. (ICC World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.