कमाईच्या बाबतीत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) विराट कोहलीपेक्षा कमी नाही. किंग खान शाहरुखबरोबर (Shah Rukh Khan) ‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमापासून अनुष्का शर्माने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात केली. आज अव्वल बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्रींच्या यादीत अनुष्काचे नाव घेतले जाते. आपल्या फिल्मी कारकिर्दीत अनुष्काने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सिनेमासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीतही अनुष्का शर्मा टॉपवर आहे.
विराटच्या संपत्तीसमोर अनुष्का शर्माची (Anushka Sharma) संपत्ती खूपच कमी आहे. सध्या अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 255 कोटी रुपये आहे. 34 वर्षीय अनुष्का महिन्याला एक कोटी आणि वार्षिक 12 कोटींहून अधिक कमावते. अनुष्काच्या कमाईच्या साधनांबद्दल चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच चित्रपटांची निर्मिती आहे. याशिवाय ती अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधूनही पैसे कमावते.
(हेही वाचा ICC World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा विक्रम)
सोशल मीडियातून कमाई
इन्स्टाग्रामवर अनुष्काचे 59.3 मिलिअर फॉलोअर्स (Anushka Insta Followers) आहेत. इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी अनुष्का 95 लाख रुपये घेते. मुंबईत अनुष्काचे स्वत:चे अलिशान घर आहे. ज्याची किंमत जवळपास 9 कोटी रुपये इतकी आहे. 2014 मध्ये अनुष्काने हे घर खरेदी केले होते. विराटसारखाचे अनुष्कालाही महागड्या गाड्यांचा छंद आहे. तिच्याकडे BMW, Range Rover आणि Mercedes सारख्या महागड्या गाड्या आहेत.
Join Our WhatsApp Community