मुंबईत सध्या हवेतील प्रदुषणाचे प्रमाण वाढलेले असताना आगामी दीपावलीच्या काळात होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजींमुळे या प्रदुषणात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांबाबत शहराचे पालकमंत्री स्पष्टच बोलले, ते म्हणाले फटाके जरुर फोडा, पण कमी फोडा, ज्यामुळे प्रदुषणही कमी होईल आणि फटाके फोडण्याचा आनंदही आपल्याला घेता येईल. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे दिवाळीच्या सणात फटाक्यांवर कोणत्याही प्रकारची बंदी नसेल हे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील हवेतील प्रदुषण वाढलेले असल्याने महापालिकेच्यावतीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मार्गदर्शक तत्वे बनवून त्यानुसार विकासकांना त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. महापालिकेच्यावतीने हवेतील वाढते प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच येणाऱ्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायू प्रदुषणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा – ICC Cricket World Cup IND VS Sri Lanka : भारताचे श्रीलंकेसमोर ३५८ धावांचे आव्हान; तिघांचे शतक हुकल्याने थोडीशी निराशा)
याबाबत शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांना विचारले असता त्यांनी दिवाळीमध्ये फटाके फोडून आतषबाजी करण्यात येत असली तरी सणाच्या आनंद लुटताना फटाक्यांमुळे प्रदुषण होणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी फटाके फोडावे, पण कमी फोडावे. ज्यामुळे फटाके वाजवण्याचे सुखही मिळेल. ज्यामुळे आवाजाचे अधिक प्रदुषण होणार नाही, तसेच या आतषबाजीमुळे वायूचेही प्रदुषण होणार नाही. त्यामुळे कमी फटाके फोडले जावेत असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community