मागील काही दिवसांपासून मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले असून मेट्रोच्या कामांमुळे जोगेश्वरीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने जोगेश्वरीतील जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदुषण नियंत्रण मशीन बसवण्यात येणार आहे. (JVLR Junction)
जोगेश्वरी पूर्व येथे नवीन विकास कामे, मेट्रो उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू आहेत. त्यामुळे जेव्हीएलआर जंक्शनच्या परिसरात प्रदूषण खूप वाढले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पत्र लिहून माजी नगरसेवक पंकज यादव यांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली होती. तसेच जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण मशीन बसवण्याची मागणी केली होती. (JVLR Junction)
(हेही वाचा – Maratha Reservation : फडणवीस यांची दिल्लीत शहांसोबत चर्चा)
त्यानुसार पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित विभागाला मुंबईत बसवण्यात येणाऱ्या पाच प्रदूषण नियंत्रण मशिनपैकी एक जेव्हीएलआर जंक्शनवर बसविण्याचे निर्देश दिले. नोव्हेंबरच्या अखेरीस हे काम पूर्ण होणार असून डिसेंबर महिन्यापासून जोगेश्वरीतील वायू प्रदूषण नियंत्रणात येईल अशी अपेक्षा भाजपा माजी नगरसेवक पंकज यादव यांनी व्यक्त केली आहे. (JVLR Junction)
वातावरणातील प्रदूषणाच्या वाढत्या स्तरामुळे श्वसन विकारही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी भाजपचे माजी नगरसेवक पंकज यादव यांनी केलेल्या सूचनांची दखल घेत पालकमंत्र्यांनी जोगेश्वरीतील जेव्हीएलआर जंक्शनवर प्रदूषण नियंत्रण मशीन लावण्याचे निर्देश दिले आहेत. (JVLR Junction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community