Cash For Query : हा काळा दिवस; निशिकांत दुबे यांचा महुआ मोईत्रा प्रकरणी संताप

प्रश्नांच्या बदल्यात पैसे घेतल्याच्या आरोपावरून महुआ मोईत्रा आणि विरोधी खासदारांनी आचार समितीच्या बैठकीतून सभात्याग केल्यानंतर भाजपने पलटवार केला.

117
Cash For Query : हा काळा दिवस; निशिकांत दुबे यांचा महुआ मोईत्रा प्रकरणी संताप
Cash For Query : हा काळा दिवस; निशिकांत दुबे यांचा महुआ मोईत्रा प्रकरणी संताप

लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या मुद्द्यावर तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आचारसंहितेच्या समितीसमोर बाजू मांडली. (Cash For Query) त्यानंतर महुआ मोईत्रा आणि विरोधी खासदारांनी आचार समितीच्या बैठकीतून सभात्याग केला. त्यामुळे भाजपने पलटवार केला. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हा इतिहासातील काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. ‘मी दोन कारणांमुळे पत्रकार परिषद घेतली नाही. पहिले म्हणजे हे प्रकरण संसदेच्या आचारसंहितेच्या समितीकडून पाहिले जात आहे. दुसरे म्हणजे राजकारणात विचार करून असे निर्णय घेतले जातात. आज संसदेच्या इतिहासातील सर्वांत काळा दिवस आहे.” (Cash For Query)

देशाच्या सुरक्षेशी खेळ

नीती समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर हे खालच्या जातीतील आहेत. या कारणावरून त्यांना विरोध केला जात आहे. महुआ मोईत्रा यांनी काही पैशांसाठी आपला विवेक पणाला लावला. महुआ मोईत्रा यांनी देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. याच संसदेत आपण खासदारांना १० हजार रुपयांची लाच घेऊन बडतर्फ करतांना पाहिले आहे. महुआ मोईत्रा लिपस्टिक मागवत असतील, तर त्यांना हाच प्रश्न विचारला जाईल. हे सर्व त्यांनी वैयक्तिक प्रश्न मानले आहेत, अशा शब्दांत निशिकांत दुबे यांनी संताप व्यक्त केला. (Cash For Query)

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठ्यांचा पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयावर मोर्चा)

जर महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, तर ते संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. ज्यामुळे महुआ मोईत्रा यांच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. महुआ मोईत्रा यांचे म्हणणे आहे की, त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी आचारसंहिता समिती योग्य मंच असू शकत नाही. महुआ मोईत्रा यांनी  या प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांची उलटतपासणी करण्याची परवानगी मागितली आहे. (Cash For Query)

काय आहे प्रकरण ?

निशिकांत दुबे यांनी 15 ऑक्टोबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले होते. अदानी समूह प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा खराब करण्यासाठी मोईत्रा यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर हिरानंदानी यांनीही मोईत्रा यांना पैशांसह भेटवस्तू दिल्याचा दावा  केला आहे. (Cash For Query)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.