दक्षिण मुंबईतील येथील सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेअंतर्गत करण्यासाठी महापालिकेच्यावतीने डिझाइन आणि बिल्ट टर्नकी गट २ अंतर्गत देण्यात आलेल्या कंत्राट कामांमध्ये तब्बल शंभर कोटींची वाढ झाली आहे. या कामांसाठी यापूर्वी ६४७.५८ कोटी रुपयांचे काम मंजूर केले होते, परंतु आता या कामांचा खर्च ७४०.६० कोटी रुपये एवढा झाला आहे. त्यामुळे या कंत्राट कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्यापूर्वीच तब्बल १७ टक्क्यांची वाढ दिली गेली आहे. (BMC)
दक्षिण मुंबईतील ६४ जेल रोड (बी विभाग), ४२ जेल रोड (बी विभाग), पी.जी. सोलंकी (डी विभाग), भायखळा ई विभागातील सिध्दार्थ नगर (फेज २), टँक पाखाडी फेज मधील घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजनेअंतर्गत पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला जुलै २०२१ रोजी मंजुरी दिली. यासाठी पुढील २४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरून या कामांसाठी शायोना कार्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी ६४७.५८ कोटींच्या कामांना मंजुरी दिली होती. (BMC)
परंतु यापैंकी बी विभागातील उमरखाडी येथील ६४ जेल रोड येथील घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या सेवा सदनिकांच्या पुनर्विकासाकरता आराखडे सादर केले असता त्याठिकाणी एकत्रित पुनर्विकासा शक्य नाही. त्यामुळे उत्तरेकडील तळ अधिक पाच आणि पूर्वेकडील तळमजला आधिक ४ अशा दोन इमारतींनाही या पुनर्विकासात समाविष्ट करणे बंधनकारक असल्याचे विकास नियोजन विभागाच्या प्रमुख अभियंत्याने स्पष्ट केले. त्यामुळे या दोन इमारतींचा पुनर्विकासात समावेश करण्ण्यात आला आणि ई विभागातील सिध्दार्थ नगर येथील बी इमारतही मोडकळीस आल्यामुळे या इमारतीचाही पुन्हा पुनर्विकासात समावेश करण्यात आला आहे. (BMC)
(हेही वाचा – JVLR Junction : जेव्हीएलआर जंक्शनवर बसवणार प्रदुषण नियंत्रण मशीन)
त्यामुळे क्षेत्रफळ वाढलेले असून बिल्टअप क्षेत्र, कार पार्किंग क्षेत्र, स्टेअर केस व लिफ्ट लॉबी क्षेत्र, रिफ्युज क्षेत्र, स्टेअर केस हेड रुम व लिफ्ट रुम, पाण्याची टाकी, मीटर रुम, सोसायटी कार्यालय स्टील्ट मजला, पंप रुम, एसटीपी, सुरक्षा चौकी, टेरेस मजला, इत्यादी विविध तरतुदींचा समावेश करण्यात आल्याने बांधकाम क्षेत्रफळ १ लाख ३२ हजार ९४९ चौरस मीटर होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च ६४७.५८ कोटी रुपयांवरून ७४०.६० कोटी रुपये एवढा झाला आहे. यामध्ये ३०० चौरस फुटाच्या १९३१ सदनिका आणि ६०० चौरस फुटाच्या ८९ सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यामुळे बांधकामाचा कालावधी १२ महिन्यांनी वाढवून २४ महिन्यांऐवजी ३६ महिने असा करण्यात आला आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community