Chhattisgarh Naxalite : छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांकडून तीन जणांची हत्या

पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून हत्या

135
Chhattisgarh Naxalite : छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांकडून तीन जणांची हत्या

छत्तीसगडच्या (Chhattisgarh Naxalite) कांकेर जिल्ह्यातील एका गावात महाराष्ट्र पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांची हत्या केली. गुरुवार २ नोव्हेंबर रोजी हे हत्याकांड घडले.

छत्तीसगड (Chhattisgarh Naxalite) पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांना या घटनेची माहिती मिळाली आहे आणि या संदर्भात अधिक तपशील गोळा केला जात आहे. पुढे प्राथमिक माहितीचा हवाला देत पोलिसांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या (कांकेर) अंतर्गत मोरखंडी गावातील रहिवासी असलेल्या कुल्ले कुतलामी (35), मनोज कोवाची (22) आणि डुग्गे कोवाची (27) यांची 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबरच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी हत्या केली.

घटनेस्थळी फेकण्यात आलेल्या पत्रकांमध्ये माओवाद्यांनी दावा केला आहे की, हे तिघेही महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 या एलिट नक्षलविरोधी पथकाचे खबरी म्हणून काम करत होते. या संदर्भात अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे, असे त्यात म्हटले आहे. (Chhattisgarh Naxalite)

(हेही वाचा – BMC Diwali Bonus : महापालिका कर्मचारी दिवाळी भेटीच्या प्रतीक्षेत)

विशेष म्हणजे, या महिन्याच्या निवडणुकांच्या प्रचारमोहिमेचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार (२ नोव्हेंबर) दुपारी 3 वाजता कांकेर शहरात जाहीर सभेला संबोधित करणार होते. अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले की, हाय-प्रोफाइल भेटीच्या पार्श्वभूमीवर आधीच मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. (Chhattisgarh Naxalite)

कांकेर जिल्ह्यात 7 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.