ऋजुता लुकतुके
तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या विश्वचषकात चांगलाच फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्धही त्याने डावाला खिंडार पाडण्याचं काम चोख बजावलं. ३५७ धावांचा बचाव करण्यासाठी भारतीय गोलंदाज मैदानात उतरले तेव्हा बुमराहने पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसांकाला पायचीत पकडलं. श्रीलंकन संघाने तिसऱ्या पंचांकडे अपील केलं. पण, टिव्ही रिप्ले पाहून हे अपील फेटाळण्यात आलं.
त्यामुळे डावाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहच्या (Jasprit Bumrah) नावासमोर बळीची नोंद झाली. हा एक असा विक्रम आहे जो विश्वचषक स्पर्धेत भारताने पूर्वी केला नव्हता. डावाच्या पहिल्याच चेंडूवर बळी टिपणारा बुमराह हा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
(हेही वाचा – Shreyas Iyer : श्रेयस अय्यरचा यंदाच्या विश्वचषकातील सर्वात लांब षटकार पाहिला?)
View this post on Instagram
बुमराहने (Jasprit Bumrah) डावाला खिंडार पाडल्यानंतर महम्मद सिराज आणि महम्मद शामी यांनी श्रीलंकेची आणखी वाताहत केली. आणि अखेर लंकन डाव ५५ धावांमध्ये आटोपला. ५ लंकन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. भारतासाठी जसप्रीत बुमराहने १, महम्मद शामीने ५, सिराजने ३ तर रवी जाडेजाने एक बळी मिळवला. (Jasprit Bumrah)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community