Exam Paper Leak : मुंबई विद्यापीठाचा पुन्हा भोंगळ कारभार; प्रश्नपत्रिका आणि उत्तरे परीक्षेपूर्वीच आली whatsapp वर

168
Exam Paper Leak : मुंबई विद्यापीठाचा पुन्हा भोंगळ कारभार; प्रश्नपत्रिका आणि उत्तरे परीक्षेपूर्वीच आली whatsapp वर

पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. प्रश्नपत्रिकेची (Exam Paper Leak) गुप्तता राखण्यात विद्यापीठ अयशस्वी ठरले आहे. विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या (सत्र-५) परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका व्हॉट्सॲपवर आल्याचा प्रकार सिद्धार्थ कॉलेजमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्सच्या सहाय्यक प्राध्यापक सुमेध जगन्नाथ माने यांच्या तक्रारीनुसार फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिद्धार्थ कॉलेजमध्ये टी.वाय.बी.कॉम.ची (सत्र-५) परीक्षा (Exam Paper Leak) सुरू आहे. ३१ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते दुपारी दीडच्या सुमारास कॉमर्स-५ या विषयाचा पेपर होता. त्यासाठी परीक्षा केंद्राचा वॉटरमार्क क्रमांक ठरलेला होता. परीक्षा हॉलमध्ये माने कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून जबाबादारी पार पाडत असताना एका विद्यार्थ्याच्या मोबाइलवर व्हॉट्सॲपमध्ये कॉमर्स-५ या विषयाची प्रश्नपत्रिका आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे असल्याचे दिसून आले. माने यांनी मोबाइल ताब्यात घेतला. प्रश्नपत्रिकेवरील वॉटरमार्क क्रमांक त्यांच्या (Exam Paper Leak) परीक्षा केंद्राचा नसून, अन्य परीक्षा केंद्राचा असल्याचे स्पष्ट झाले.

(हेही वाचा – Chhattisgarh Naxalite : छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांकडून तीन जणांची हत्या)

याबाबत तत्काळ कॉलेज प्रशासनातर्फे मुंबई विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली. विद्यपीठाने (Exam Paper Leak) म्हंटले की, आमच्याकडे तक्रार आली आहे. पण पेपर फुटलेला नाही. एकाच मुलाच्या व्हॉट्सॲपवर पेपर आल्याचे आढळून आले. याबाबत पोलिस तपासात अधिक माहिती पुढे येईल.” (Exam Paper Leak)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.