ऋजुता लुकतुके
विक्रम हे मोडण्यासाठीच असतात असं म्हणतात. आणि विराट कोहली (Virat Kohli) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा टप्प्यावर आहे की, तो खेळला की एखादा तरी विक्रम मोडतोच. श्रीलंकेविरुद्ध त्याने ९२ चेंडूंत ८८ धावा केल्या. सचिनच्या ४९ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी थोडक्यात हुकली असली, तरी सचिनचा आणखी एक विक्रम त्याने मोडलाच.
त्याच्या ८८ धावांमुळे कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये (Virat Kohli) विराटने १,००० धावा पूर्ण केल्या. आणि एका वर्षात १,००० पेक्षा जास्त धावा करण्याची त्याची ही तब्बल आठवी वेळ होती. हा एक विक्रमच आहे. यापूर्वी सचिनच्या नावावर असलेला विक्रम आता विराटने मोडलाय.
First player to slam 1⃣0⃣0⃣0⃣+ ODI runs in 8⃣ calendar years 👑#PlayBold #INDvSL #CWC23 #ViratKohli @imVkohli pic.twitter.com/U5GPt3sh2M
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) November 2, 2023
यापूर्वी (Virat Kohli) विराटने २०११, २०१२, २०१३, २०१४ आणि २०१७,२०२८ आणि २०१९ मध्ये अशी कामगिरी केली होती. त्यानंतर विराटच्या कारकीर्दीत एरवी दुर्मिळ असलेला एक खराब फॉर्मचा पॅच आला. आणि सध्या त्यातून सावरून तो पुन्हा चांगली कामगिरी करतोय.
(हेही वाचा – St News : एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरू; दिवाळीसाठी जादा गाड्या सोडणार)
सचिनने आपल्या कारकीर्दीत १९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३ आणि २००७ मध्ये १,००० धावांचा टप्पा सर केला होता.
शिवाय (Virat Kohli) विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध १० एकदिवसीय शतकं ठोकली आहेत. आणि एका फलंदाजाने एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतकांचा केलेला हा विक्रमच आहे. सचिनच्या नावावर एका वर्षांत सर्वाधिक एकदिवसीय धावा जमवण्याचा विक्रमही आजही जमा आहे. १९९८ साली त्याने १,९५६ धावा केल्या होत्या.
विराटचं (Virat Kohli) शतक बुधवारी हुकलं. पण, त्याने ११८ अर्धशतकं आता केली आहेत. आणि त्या बाबतीत श्रीलंकन माजी फलंदाज कुमार संगकारासह तो अव्वल स्थानावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community