ड्रग्ज प्रकरणातील (Lalit Patil Drugs Case) सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याचा सखोल तपास आवश्यक आहे. हा देशातील तरुणाई नासवण्याचा प्रकार आहे. या गुन्ह्यांच्या मुळाशी जायचे आहे. असे सांगून तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी ललितसह दोन्ही आरोपींना चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे पुणे पोलिसांनी ललित पाटीलसह १४ जणांवर मोक्काची कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातून राज्यभर अमली पदार्थांचे मोठे रॅकेट चालवणाऱ्या (Lalit Patil Drugs Case) ललित पाटीलसह 14 जणांच्या टोळीविरुद्ध स्टिंग ऑपरेशन केले आहे. ललित पाटील, अरविंद लोहरे, अमित शहा उर्फ अमित मंडल, रॉफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बालकवाडे, गोलू सुलतान अन्सारी, प्रज्ञा कांबळे, झीशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांच्यासह साधन कांबळे, इम्रान शेख, हरिश्चंद्र पंत यांच्यावरती मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचा – S Jaishankar : वेगळा पॅलेस्टिनी देश निर्माण करणे आवश्यक – एस जयशंकर)
कोणावर मोक्काची कारवाई होते?
हफ्ता वसुली, खंडणीसाठी अपहार, सुपारी देणे, खून, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी यांच्यासारखे संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो. मोक्का लावण्यासाठी गु्न्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते. (Lalit Patil Drugs Case)
ललित पाटील याच्याकडून 5 किलो सोने जप्त
ललित पाटील (Lalit Patil Drugs Case) याने हे सोनं अमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून विकत घेतले होते. त्यापैकी यापूर्वी 3 किलो सोने जप्त करण्यात आले होते, आता आणखी 5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. गुरुवारी (२ नोव्हेंबर) पुणे पोलिसांचे एक पथक ललित पाटील यांना नाशिकला घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांनी सोने जप्त केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community