Pune University ला JNUची लागण; का बनले वातावरण तणावग्रस्त? 

207

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Pune University) सध्या वादात सापडले आहे. या विद्यापीठात आता डाव्या विचारांच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या विद्यार्थी संघटनेने स्वतःचा अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. ज्याप्रकारे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) मध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी थैमान घातले आहे. तसेच पुणे विद्यापीठात या संघटनेने सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण बनले आहे.

Pune University च्या वसतिगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. ज्यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी, २ नोव्हेंबर रोजी SFI आणि समविचारी संघटनांनी विद्यापीठात निदर्शने केली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाने विद्यापीठात आक्रमक आंदोलन केले. विशेष म्हणजे १ नोव्हेंबर रोजी या विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि SFI या दोन संघटनांमध्ये सदस्य नोंदणीवरून हाणामारी झाली होती.
जेव्हा Pune University च्या मुख्य इमारतीच्या समोरील आंदोलन संपल्यानंतर भाजप आणि अभाविपचे कार्यकर्ते परतत असताना मोठा राडा झाला. आणि सदस्य नोंदणी रोखली. यावेळी पोलिसांनी SFI च्या कार्यकर्त्यांना संरक्षण दिले. या प्रकरणी दोन्ही संघटनांच्या वतीने एकमेकांच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

(हेही वाचा Holidayचा प्लॅन करताय Indore सर्वोत्तम; जाणून घ्या कोणती आहेत आकर्षक ठिकाणे?)

कशामुळे झाला वाद? 

दोन दिवसांपूर्वी Pune University च्या वसतिगृह क्रमांक ८ च्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात इंग्रजी भाषेत अतिशय अश्लील मजकूर लिहिण्यात आला होता. यामुळे वादाला तोंड फुटले. या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.