विमानात आपत्कालिन परिस्थितीत काय करायचं, यासंदर्भातील सूचना एअर होस्टेसकडून दिली जाते. हीच पद्धत आता खासगी बसमध्येही बंधनकारक करण्यात येणार असल्याता निर्णय राज्य परिवहन विभागाने (Maharashtra State Transport) घेतला आहे. खासगी बसच्या अपघातात वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती नागपूरचे (nagpur) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके (Regional Transport Officer ) यांनी दिली आहे.
खासगी ट्रॅव्हल्स बसमध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, बसच्या दर्शनी भागात बसचालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातील माहिती याविषयीचे स्टिकर लावणे बंधनकारक राहणार आहे. विमान प्रवासात ज्याप्रमाणे एअर होस्टेस आपत्कालिन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे, याची सूचना प्रवाशांना देते तशाच सूचना बस प्रवास सुरू होण्याआधी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Dy Chandrachud: आवश्यकतेशिवाय सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करू नका, डीवाय चंद्रचूड यांचे वकिलांना आवाहन)
दिवाळीच्या काळात होणारी लूट थांबेल
एसटीपेक्षाही कमाल दीडपट भाडं खासगी वाहतूकदार आकारतात. खासगी वाहनांना बसेस आणि ट्रॅव्हल्सला भाडे निश्चिती मोटार अॅक्टनुसार करण्यात आली असून ती एसटीच्या भाड्यापेक्षा ५० टक्के जास्त आहे. त्यामुळे जास्त भाडे घेतल्यास खासगी ट्रॅव्हल्सविरोधात कठोर कारवाईही केली जाणार असल्याची सूचनाही परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे. याशिवाय बसचा आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. स्लीपर बसचे अपघात रोखणे (Travels Accident) आणि आपत्कालिन प्रसंगी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना व सूचना जारी करण्यात आल्या आहेत.