Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा ‘या’ 10 टिप्स

जम्मू-काश्मीरच्या सौंदर्यात बर्फाच्छादित पर्वत अधिकच भर घालतात. जम्मू-काश्मीरच्या दऱ्यांवर हिरव्यागार टेकड्या मखमली दिसतात. जम्मू-काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर तेथील पर्यटनस्थळे कशी शोधायची, हे वाचा...

155
Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा 'या' 10 टिप्स
Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा 'या' 10 टिप्स

सायली डिंगरे

‘या सुट्टीत जम्मू-काश्मीरला (Tourist Places in Jammu) ट्रिपला जायचं म्हणजे जायचंच…’, अशा प्रकारचा हट्ट तुमच्याही घरी होऊ लागला आहे का ? ही पोस्ट खास तुमच्यासाठीच आहे !

मुलांच्या परीक्षा संपत आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तयारीसोबत सुट्ट्यांचे प्लॅनही जोरदार चालू आहेत. दिवाळीनंतर लग्नसराई चालू होत आहे. त्यामुळे लग्नानंतरच्या outing चे प्लॅनही चालू झाले आहेत. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या मखमली डोंगरदऱ्या कुणाला खुणावत नाहीत ? (Tourist Places in Jammu)

पृथ्वीचा स्वर्ग जम्मू-काश्मीर हिमालयाच्या कुशीत वसला आहे. जम्मू-काश्मीरच्या सौंदर्यात बर्फाच्छादित पर्वत अधिकच भर घालतात. जम्मू-काश्मीरच्या दऱ्यांवर हिरव्यागार टेकड्या मखमली दिसतात. जम्मू-काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर तेथील पर्यटनस्थळे कशी शोधायची, याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजकाल google मुळे जग जवळ आले आहे, त्यामुळे सुट्टीचा प्लॅन करण्यापूर्वी google सर्च तर नक्कीच केले जाते. त्यासह असे कोणते पर्याय आहेत, ज्यामुळे तुमची ट्रिप चांगली होईल ?

(हेही वाचा – Dy Chandrachud: आवश्यकतेशिवाय सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करू नका, डीवाय चंद्रचूड यांचे वकिलांना आवाहन)

१. आपण best places in jammu असे गुगलवर search केल्यानंतर tripadvisor, traveltriangle, holidify अशा अनेक साईट्सच्या लिंक येतात. त्यापैकी तुम्ही जे संकेतस्थळ पाहणार, त्यातील माहिती विश्वासार्ह असल्याची निश्चिती करा. अशा अनेक पर्यटन साईट्स तुम्हाला चांगली मदत करतील.

२. गेल्या काही वर्षांपासून पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. प्रत्येक राज्यातील पर्यटनस्थळांची यादी त्या त्या राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली असते. www.jktdc.co.in ही जम्मू काश्मीर सरकारची अधिकृत साईट आहे. त्या साईटला भेट दिल्यास जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळांची माहिती आकर्षक छायाचित्रांसह दिलेली आहे. रहाण्याच्या आणि भोजनाच्या सोयीसह अनेक तपशील येथे मिळतील.

३. tourism.jk.gov.in ही देखील जम्मू-काश्मीर सरकारची अधिकृत साईट आहे. येथेही अधिकृत आणि विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा 'या' 10 टिप्स
Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा ‘या’ 10 टिप्स

४. अलीकडे अनेक ट्रॅव्हल ब्लॉगर्स त्यांच्या ब्लॉगवर विविध पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती देत असतात. या ब्लॉगमधून त्या पर्यटनस्थळी कसे जावे, यासह त्या ठिकाणी कोणत्या अडचणी येऊ शकतात, याविषयीही सांगितलेले असते. त्या अडचणीवर उपाय कसा काढला जाऊ शकतो, त्यासाठी कोणते साहित्य सोबत ठेवावे, हेही सांगितल्यामुळे मोठ्या प्रवासाला निघण्यापूर्वी असे ब्लॉग्स अवश्य वाचावेत. jammu travel blogs असे Google Search केल्यानंतर तुम्हाला असे अनेक अनुभवी पर्यटकांचे अनुभव वाचण्यास मिळतील. (Tourist Places in Jammu)

५. ज्यांना इतरांचे अनुभव व्हिडिओही Youtube, Facebook, Instagram या माध्यमांवरही उपलब्ध असतात. jammu travel vlogs असे Google Search केल्यानंतर तुमच्यासमोर अनुभवांचा खजिना उघडेल.

६. भारतीय रेल्वेही विविध पर्यटनस्थळी सहलींचे नियोजन करत असते. त्यासाठी www.irctctourism.com या संकेतस्थळाला भेट दिल्यास सविस्तर माहिती मिळू शकेल. irctc कडून ही टूर केल्यास या पॅकेजमध्ये भोजन, रात्रीचा मुक्काम, स्थानिक ठिकाणी भेटी देणे यासाठीचे विविध पर्याय मिळतात. जम्मू-काश्मीरच्या ट्रिपसाठीही irctc कडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा 'या' 10 टिप्स
Tourist Places in Jammu : जम्मू-काश्मीरची ट्रीप प्लॅन करण्यासाठी वाचा ‘या’ 10 टिप्स

७. ज्यांना अशा प्रकारे स्वतः माहिती शोधून ट्रिप प्लॅन करायची नसेल, त्यांच्यासाठी अनेक टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत. MakeMyTrip, yatra, trivago सारखी संकेतस्थळे नेहमीच तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. जम्मू-काश्मीरसाठी search केल्यास तुम्हाला नक्कीच अनेक पर्याय आणि तुमच्या ट्रीपचा सुंदर प्लॅन तयार मिळेल.

८. ज्यांना प्रत्यक्ष संवाद साधून ट्रीपचे नियोजन करायचे आहे, त्यांच्यासाठी केसरी टूर्स आणि ट्रॅव्हल्स, वीणा वर्ल्ड यांसारख्या आपल्या शहरातील नामांकित टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातही आपल्याला ही माहिती सहजतेने मिळेल.

९. पूर्वी अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळांची माहिती देणारी पुस्तके उपलब्ध असायची. या पुस्तकात अगदी नजीकच्या रेल्वे स्थानकापासून ते स्थानिक हॉटेलच्या संपर्क क्रमांकापर्यंत सविस्तर माहिती असायची. आता गूगलवर एका क्लिकमध्ये सर्व माहिती मिळते, त्यामुळे पुस्तके विकत घेणे हे इतिहासजमा झालेले आहे. परंतु हे पुस्तक हा त्या सहलीचा कौटुंबिक ठेवा होत असे. (Tourist Places in Jammu)

१०. यापूर्वी ज्यांनी जम्मू काश्मीरला भेट दिली आहे, त्यांच्याशी केलेली चर्चा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

जम्मूची स्थापना आठव्या शतकात राजा लोचन याने केली होती. येथे श्री वैष्णोदेवी धाम, श्री रघुनाथ मंदिर, श्री महामाया मंदिर यासारखी नयनरम्य वातावरण असलेली प्रसिद्ध मंदिरे, तसेच अमर महाल, मुघल गार्डन, इंदिरा गांधी ट्यूलिप गार्डन, कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बनवलेले द्रास मेमोरियल यासारखी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. जम्मूला आल्यावर तुम्ही या ठिकाणांची सहल करू शकता आणि सहलीबरोबरच जम्मूमधील स्वादिष्ट खाद्यपदार्थांची चवदेखील घेऊ शकता. (Tourist Places in Jammu)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.