पुण्यातील ससून रुग्णालयात शुक्रवारी (३ नोव्हेंबर) बारा वाजण्याच्या सुमारास चौथ्या ते पाचव्या मजल्यावर लिफ्ट अडकल्याची घटना घडली. (Sassoon Hospital) या घटनेत पाच पुरुष आणि एक महिला असे मिळून सहाजण लिफ्ट मध्ये अडकले होते. अग्निशमन दलाकडून अडकलेल्या सहा जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान नागरिक लिफ्टमध्ये अडकल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती.
लिफ्ट अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहचताच लिफ्टमध्ये सहा जण असल्याची खात्री झाली. सुमारे तासभर अडकलेल्या लोकांना जवानांनी ‘घाबरू नका, आम्ही आहोत’ असे म्हणत धीर दिला. (Sassoon Hospital)
(हेही वाचा – Maharashtra State Transport: खासगी बसमध्येही आपत्कालिन सूचना देणं बंधनकारक, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निर्णय)
ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली होती. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पुणे मनपाच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लिफ्टमध्ये अडकलेल्या ५ पुरुष आणि १ महिलेची सुटका केली. लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांसाठी मनपाला रेस्क्यू करावे लागले. त्यासाठी लिफ्ट कापून काढावी लागली. सुमारे तासभर सहा जण लिफ्टमध्ये अडकले होते. त्यामुळे त्यांना श्वास घेणेही अवघड झाले होते. (Sassoon Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community