Air Pollution: दिल्लीत २ दिवस सर्व शाळा का बंद ठेवाव्या लागल्या? वाचा कारण…

वाहनांना २० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे.

105
Air Pollution: दिल्लीत २ दिवस सर्व शाळा का बंद ठेवाव्या लागल्या? वाचा कारण...
Air Pollution: दिल्लीत २ दिवस सर्व शाळा का बंद ठेवाव्या लागल्या? वाचा कारण...

दिल्ली एनसीआर (Air Pollution) परिसरातील नागरिकांना श्वासाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील हवेतील विषारी धुळीच्या कणांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. त्यामुळे येथील शाळाही २ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे केंद्रीय प्रदूषण मंडळाने बांधकाम, दगड फोडण्याची कामे, उत्खननावर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

दिल्ली गुरुग्राम, फरिदाबाद, गाजियाबाद आणि गौतमबुद्ध नगरमध्ये बीएस-३, बीएस-४च्या डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अशी वाहने रस्त्यावर दिसली, तर मोठा दंड भरावा लागणार आहे.

(हेही वाचा –Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकले सहा जण ) 

दिल्ली परिवहन विभागाने बीएस-३ बीएस-४ डिझेलच्या वाहनांना २० हजार रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत श्रेणीबद्ध प्रतिसाद योजना स्टेज-३ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दिल्लीतील बांधकामाशी संबंधित कामे थांबवण्यात आली आहेत. दररोज रस्त्यांची सफाई करण्यासह पाण्याची फवारणी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.