NIA Action Against PFI : पी.एफ.आय.साठी भरती चालूच… सलून चालवणाऱ्यांवर एन्आयएची मोठी कारवाई

महंमद आसिफ उर्फ आसिफ, सादिक सराफ आणि महंमद सोहेल हे पीएफ्आयचे प्रशिक्षित दहशतवादी असल्याचे उघड झाले. ते या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कटात सहभागी आहेत. हे ३ प्रशिक्षित दहशतवादी पी.एफ्.आय.साठी भरती करण्यात गुंतलेले होते.

129
NIA Action Against PFI : पी.एफ.आय.साठी भरती चालूच... सलून चालवणाऱ्यांवर एन्आयएची मोठी कारवाई
NIA Action Against PFI : पी.एफ.आय.साठी भरती चालूच... सलून चालवणाऱ्यांवर एन्आयएची मोठी कारवाई

एन्आयएने राजस्थानच्या कोटा येथून पीएफ्आयच्या २ दहशतवाद्यांना अटक केली आहे. (NIA Action Against PFI) वाजिद अली आणि मुबारक अली अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. अटक केलेले दोन्ही दहशतवादी कोटाचे रहिवासी आहेत. त्यांनी पी.एफ.आय.साठी दहशतवादी हल्ल्याचा कट रचला आहे. तपासादरम्यान मोहम्मद आसिफ उर्फ आसिफ, सादिक सराफ आणि मोहम्मद सोहेल हे पीएफआयचे प्रशिक्षित दहशतवादी असून ते प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कटात सहभागी असल्याचे उघड झाले. हे तिघे प्रशिक्षित दहशतवादी आहेत. ते पी.एफ.आय.साठी भरती करत असत. हे तिघे इतरांना शस्त्रे हाताळण्याचे आणि दहशतवादी कारवाया करण्याचे प्रशिक्षण देण्यात गुंतलेले आहेत. (NIA Action Against PFI)

(हेही वाचा – Air Pollution: दिल्लीत २ दिवस सर्व शाळा का बंद ठेवाव्या लागल्या? वाचा कारण…)

दंगली भडकवण्याचा कट

हे तिघेही त्यांच्या संघटनेत मुसलमान तरुणांची भरती करून दंगली भडकवण्याच्या कटात गुंतलेले होते. लोकांमध्ये धार्मिक भेदभाव निर्माण करत होते आणि ते विशेषतः राजस्थानमध्ये दहशतवादी कृत्यांसाठी प्रशिक्षण घेत होते. अटक करण्यात आलेल्या वाजिद अली आणि मुबारक अली या दहशतवाद्यांसह हे तिघे राजस्थानातील जयपूर आणि कोटा येथे प्रशिक्षण देण्यात गुंतलेले होते. हे लोक 2047 पर्यंत पी.एफ.आय.च्या भारतातील इस्लामी राजवटीच्या अजेंड्याखाली लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी काम करत होते. यासाठी ते मुसलमान तरुणांना त्यांच्या संघटनेत सामील होण्यासाठी प्रवृत्त करून दहशतवादी कारवायांचे नियोजन करत होते. (NIA Action Against PFI)

मुबारक अली आणि वाजिद या दोघांचेही मोबाईल, अनेक कागदपत्रे आणि संगणकाच्या हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. वाजिद तरुणांना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण देतो. मुबारक अलीचे कोटामध्ये एक सलून आहे. प्राथमिक चौकशीनंतर दोघांना अटक करण्यात आली. मुबारक पीएफआय, तसेच एसडीपीआयशी संबंधित आहे.

हे लोक त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुस्लिम धर्माच्या लोकांकडून जकातच्या नावाखाली पैसे गोळा करत होते आणि या पैशाचा वापर भरती केलेल्या लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी करत होते. त्यांच्या हेतूंनुसार भारत सरकारने त्यांच्या धोकादायक हेतूंना आळा घालण्यासाठी सप्टेंबर 2022 मध्ये पी.एफ्.आय. ला बंदी घातलेली संस्था म्हणून घोषित केले. यापूर्वी जानेवारीत एन्आयएने कोटाच्या विज्ञान नगरमध्ये छापे टाकले होते. (NIA Action Against PFI)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.