पर्यटकांचे आकर्षण आणि प्रेमाचे प्रतीक अशी ओळख असणाऱ्या ताजमहालाच्या स्थापनेविषयी वाद आहे, मात्र आता या वास्तूविषयी एका नवीन दावा केला जात आहे.
ताजमहाल हा मुघल बादशहा शाहजहान याने बांधला नसून तो मूळ हिंदू राजा मान सिंग याने बांधला असल्याचा दावा करणारी जनहित याचिका हिंदू सेना नावाच्या संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल केली होती. या प्रकरणी भारतीय पुरातत्त्व विभागाला पडताळणी करण्यासाठी लक्ष घालण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
(हेही वाचा – Israel-Hamas conflict : इस्रायलमध्ये अडकलेल्या पॅलेस्टिनी कामगारांना गाझामध्ये परत पाठवण्यास सुरुवात)
#Breaking
Delhi High Court asks ASI to consider the representation submitted by an organisation named ‘Hindu Sena’ which had filed a PIL to change the “incorrect history” about the Taj Mahal” and claiming that it was not built by Shah Jahan.#TajMahal #HinduSena #DelhiHighCourt pic.twitter.com/wNk2AWPZxt— Bar & Bench (@barandbench) November 3, 2023
हिंदू सेनेचे अध्यक्ष सूरजित सिंह यांनी ताजमहाल हा मूळचा राजा मानसिंग याचा वाडा होता. त्यात बदल करून शाहजहान याने आपलं नाव दिलं होतं. शाहजहान याची पत्नी मुमताज महल हिच्या मृत्यूनंतर दफन करण्यासाठी शाहजहान याला एक रम्य, शांत जागा हवी होती. त्यामुळे त्याने त्यावेळी राजा जयसिंग याच्या ताब्यात असलेल्या मानसिंगाच्या वाड्याची निवड केली. त्यामुळे हा महाल शाहजहान याने बांधला असल्याचा जो उल्लेख शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये केला जातो, तो ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा असल्याचा दावा हिंदू सेनेने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.
या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या युक्तिवादावर निर्णय देताना न्यायालयाने म्हटलं आहे की, याचिकाकर्त्यांनी यापूर्वी याच मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे याप्रकरणी भारतीय पुरातत्त्व विभागाने लक्ष घालावं, असे आदेश देत दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community