Mumbai University : मुंबईत रंगणार शिवकालीन क्रीडा महोत्सव; मुंबई विद्यापीठ देणार प्रोत्साहन

157
शिवकालीन युगातील खेळ प्रकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. ९ ते २३ डिसेंबर २०२३ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या विविध प्रभागात ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव’ साजरा करणार आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ सहभागी होणार आहे.
शिवकालीन देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळावे आणि पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर क्षेत्रात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवात लेझीम, लगोरी, मानवी मनोरे, लंगडी, रस्सीखेच, मल्लखांब, पंजा लढवणे, कुस्ती, दंड बैठका, दोरीच्या उड्या, मॅरेथॉन, शरीरशौष्ठव, फुगड्या, ढोल ताशा प्रदर्शन, विटी-दांडू, दांड पट्टा, लाठी काठी, ढाल-तलवार, गदा/मुदगल या खेळांचा समावेश असणार आहे. या खेळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करण्याकरता मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आणि जिल्हा क्रीडा अधिकारी महाराष्ट्र शासन व क्रीडा भारती यांच्यात करार झाला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.