MCGM Vehicles : महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांसाठी पाच टोयोटा इनोव्हा, पण इलेक्ट्रिक वाहनांचा विसर

मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या वापरात असलेल्या विदयमान मारुती सियाझ तसेच व्होल्क्सवॅगन ही वाहने छोटी असल्याने ही वाहने बदलून आता टोयोटा इनोव्हा वाहन खरेदी केले जाणार आहे.

155
MCGM Vehicles : महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांसाठी पाच टोयोटा इनोव्हा, पण इलेक्ट्रिक वाहनांचा विसर
MCGM Vehicles : महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांसाठी पाच टोयोटा इनोव्हा, पण इलेक्ट्रिक वाहनांचा विसर
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या वापरात असलेल्या विद्यमान मारुती सियाझ तसेच व्होक्सवॅगन ही वाहने छोटी असल्याने ही वाहने बदलून आता टोयोटा इनोव्हा वाहन खरेदी केले जाणार आहे. अतिरिक्त आयुक्तांसाठी तब्बल ५ टोयोटा इनोव्हा वाहने खरेदी केली जात असून प्रत्यक्षात महापालिकेत चार अतिरिक्त आयुक्त आहेत आणि त्यांच्यासाठी पाच वाहने खरेदी केली जात आहे. त्यातच एका बाजुला इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाईल अशाप्रकारचे आश्वासन देणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून प्रत्यक्षात आपल्याच अधिकाऱ्यांच्या सेवेमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जात नाही. (MCGM Vehicles)

पर्यावरणपुरक इलेक्ट्रिक वाहने अर्थात इव्ही ही काळाची गरज असून नागरिकांनी पर्यावरण पुरक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा आणि आपल्या दैनंदिन जीवनातही पर्यावरण पुरक बाबींचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात असतानाच प्रत्यक्षात मात्र महापालिका अतिरिक्त आयुक्तांसाठी पाच टोयाटा इनोव्हा वाहन खरेदी करताना या पर्यावरण पुरक वाहनांचा विसर पडलेला आहे. प्रति वाहन ३१ लाख २२ हजार ९५३ रुपये दराने खरेदी केले जात असून पाच वाहनांसाठी १ कोटी ६२ लाख ३९ हजार ३५६ रुपये मोजले जाणार आहे. टोयोटा इनोव्हा हे वाहने अधिकृत विक्रेते असलेल्या मधुबन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून खरेदी केले जात आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ही वाहने महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. (MCGM Vehicles)

(हेही वाचा – Delhi High Court: ताजमहाल कोणी बांधला? उच्च न्यायालयाकडून भारतीय पुरातत्त्व विभागाला पडताळणीचे आदेश)

मुंबईत दैनंदिन आपत्कालिन प्रसंग उद्भवत असतात. या प्रसंगांमध्ये घरे तथा इमारतींचे भाग कोसळणे, दरड कोसळणे, आग, समुद्रात बुडण्याच्या घटना आदी पूर सदृश्य परिस्थिती घडत असतात. महानगरपालिकेच्या सर्व अतिरिक्त आयुक्तांना आपत्ती प्रसंगी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य राबवण्यासाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा लागतो तसेच त्यावर देखरेख ठेवावी लागते. त्यामुळे सध्या सर्वांच्या वापरात असलेल्या मारुती सियाझ तसेच व्होक्सवॅगन वेंटो वाहने असली तरी ही वाहने छोटे असल्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यास अडथळे येण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे आपत्ती प्रसंगी घटनास्थळी पोहोचण्याकरिता कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत याकरिता महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना देण्यात येणारी जुनी मारुती सियाझ तथा व्होक्सवॅगन वेंटो वाहने बदलून ०६ टोयोटा इनोव्हा वाहने खरेदी करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (MCGM Vehicles)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.