पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी (3 ऑक्टोबर) संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली आणि पश्चिम आशियातील परिस्थितीसह अनेक मुद्यांवर चर्चा केली.
“पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांशी विविध मुद्द्यांबाबत चर्चा झाली. “दहशतवाद, बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागल्याबद्दल त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांनी चिंता व्यक्त केली.
(हेही वाचा – English Premier League : लीग कपमधून गतविजेते मॅनयु आऊट)
या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारत-संयुक्त अरब अमिराती व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या कक्षेत राहून विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्याच्या हेतूने विचारविनिमय केला.
शांतता राखण्यासाठी भारताचा पुढाकार
भारताकडे आशेने पाहत असलेली इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध सध्या सुरूच आहे. गेल्या 7 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि हजारो लोकांचा युद्धात बळी गेला. या काळात, जग भारताकडे आशेने पाहत आहे. देशादेशांमधील शांततेसाठी जर कोणता देश पुढाकार घेऊ शकतो, तर तो फक्त भारत आहे, अशी आशा त्यांनी भारताबाबत व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
दहशतवाद, बिघडलेली सुरक्षा परिस्थिती आणि नागरी जीवितहानी याबाबत आम्ही गंभीर चिंता व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अधिकृत पोस्टमध्ये Xवर लिहिले आहे. सुरक्षा आणि मानवतावादी परिस्थितीवर लवकर तोडगा काढण्याच्या गरजेबाबत आम्ही सहमत आहोत आणि शाश्वत प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य हे प्रत्येकाच्या हिताचे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community