Diet Tips : ८०:२० फॉर्मुला; ‘हा’ डाएट केल्याने तुम्ही रहाल फिट

८०% (टक्के) निरोगी जेवण जसे भाजीपाला, फळे, प्रोटिन सलाड वैगेरेचा समावेश आणि २०% (टक्के) कार्बोहायड्रेट म्हणजे चपाती आणि भाताचा समावेश करणे. हे डाएट तुम्हाला कॅलरीजचे संतुलन ठेवण्यात मदत करते.

185
Diet Tips : ८०:२० फॉर्मुला; 'हा' डाएट केल्याने तुम्ही रहाल फिट
Diet Tips : ८०:२० फॉर्मुला; 'हा' डाएट केल्याने तुम्ही रहाल फिट

सुंदर दिसायला सगळ्यांनाच आवडतं. (Diet Tips) सगळ्यांनी आपल्याला, आपल्या सुंदरतेचे गुपित विचारावे, असे आपल्या सगळ्यांनाच वाटते. सुंदर दिसण्याकरिता शरीर फिट असणं गरजेच आहे. फिट असण्यासाठी एक निरोगी डाएट फाॅलो करणे गरजेचे आहे. बाजारात बरेच डाएट उपलब्ध आहेत. बरेच लोक हे डाएट फाॅलोसुद्धा करतात, परंतु त्यांना हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत आणि म्हणून ते असे डाएट अर्ध्यातच सोडतात.

८०:२० फॉर्मुला डाएटचे फायदे बरेच आहेत आणि ते करायला सोपे आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला हा डाएट प्लॅन कसा फाॅलो करायचा, हे सांगणार आहोत. या डाएटचा अर्थ म्हणजे ८०% (टक्के) निरोगी जेवण जसे भाजीपाला, फळे, प्रोटिन सलाड वैगेरेचा समावेश आणि २०% (टक्के) कार्बोहायड्रेट म्हणजे चपाती आणि भाताचा समावेश करणे. हे डाएट तुम्हाला कॅलरीजचे संतुलन ठेवण्यात मदत करते. पोटसुद्धा जास्त काळापर्यंत भरलेले रहाते. (Diet Tips)

(हेही वाचा – English Premier League : लीग कपमधून गतविजेते मॅनयु आऊट)

संतुलन ही फक्त काळाची नसून चांगल्या आहाराची देखील गरज आहे. या डाएटमध्ये तुम्हाला काहीही खाणे टाळायची गरज नाही, पण समतोल राखणे गरजेचे आहे. ८० टक्क्यांमध्ये ज्या गोष्टींचे तुम्ही सेवन करणार आहेत, ते प्रोटिन आणि फायबरने समृद्ध आहे. ते खाल्यामुळे तुम्हाला कधीच कुठलाही आजार होणार नाही. (Diet Tips)

जे २० टक्के जेवण तुम्ही खाता, ते तुम्हाला मानसिक समाधान देते. त्यामुळे डाएटिंग करत असतांनासुद्धा, डाएटिंग केल्यासारखे वाटत नाही. शरीर आणि मन दोन्हीची गरज भागते. जर तुम्हाला तुमच्या आहारात संतुलन हवे असेल, तर ८०:२० फॉर्मुलाचा हा डाएट नक्कीच फाॅलो करा. (Diet Tips)

८०:२० फॉर्मुला डाएटचे फायदे 
  • डाएटमध्ये समतोल राखण्यात मदत करते.
  • वजन नियंत्रणात ठेवते.
  • जास्त खाणे नियंत्रणात येते.
  • पचनक्रिया मजबूत करते.
  • ८०:२० च्या नियमांमुळे शरीराची उर्जा वाढते.
  • प्रतिकारशक्ती वाढवते. (Diet Tips)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.