Air Pollution In Mumbai : मुंबईतील सुमारे ६५० रस्ते धुतले जाणार पाण्याने, राहुल शेवाळेंच्या ‘त्या’ मागणीची आता झाली आठवण

मुंबईतील वाढत्या धुळीच्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईतील विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुतले जात असून अशाप्रकारे संपूर्ण मुंबईतील सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्यात येणार आहे.

256
Air Pollution In Mumbai : मुंबईतील सुमारे ६५० रस्ते धुतले जाणार पाण्याने, राहुल शेवाळेंच्या 'त्या' मागणीची आता झाली आठवण
Air Pollution In Mumbai : मुंबईतील सुमारे ६५० रस्ते धुतले जाणार पाण्याने, राहुल शेवाळेंच्या 'त्या' मागणीची आता झाली आठवण

मुंबईतील वाढत्या धुळीच्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईतील विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुतले जात असून अशाप्रकारे संपूर्ण मुंबईतील सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्यात येणार आहे. यासाठी पाण्याचे १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार व संसदेतील शिवसेना गटनेते राहुल शेवाळे हे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांनी वाढत्या धुळीच्या प्रदुषणाबाबत मुंबईतील रस्ते पाण्याने धुण्याचे निर्देश तत्कालिन महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करताना अखेर शेवाळेंनी केलेल्या मागणीचा अनेक वर्षांनंतर आता विचार करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. (Air Pollution In Mumbai)

मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रण कामांचा तसेच प्रगतिपथावर असलेल्या उपाययोजनांचा अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी ३ नोव्‍हेंबर २०२३ सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित खाते यांची व्यापक बैठक घेतली. यामध्ये उपआयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) चंदा जाधव, उपआयुक्‍त (पायाभूत सुविधा) उल्‍हास महाले यांच्यासह परिमंडळांचे उपआयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख, घनकचरा विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (Air Pollution In Mumbai)

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी महानगरपालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत, अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर ही कामे सुरु करण्यात आली आहेत. (Air Pollution In Mumbai)

New Project 33

मुंबई महानगरात मिळून ‘इतके’ रस्ते करणार स्वच्छ

अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. शिंदे यांच्या निर्देशांनुसार, रस्ते व पदपथ यावरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र (vehicle mounted anti-smog machines) कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच, सर्व प्रशासकीय विभागांमध्ये प्रामुख्याने जिथे वर्दळ अत्याधिक आहे, अशा परिसरांमध्ये रस्ते, पदपथ यांची विशेष स्वच्छता तसेच पाण्याचे धुवून काढण्याची कार्यवाही वेगाने केली जात आहे. संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. (Air Pollution In Mumbai)

विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, वायू प्रदुषणाच्या निरनिराळ्या उपाययोजनांची प्रगती जाणून घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सर्व संबंधितांसह व्यापक बैठक घेतली. (Air Pollution In Mumbai)

New Project 34

‘या’ पदपथांवर देणार अधिक लक्ष 

घनकचरा विभागाच्या कार्यवाहीविषयी माहिती देताना उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) चंदा जाधव म्‍हणाल्‍या की, धूळ नियंत्रण मोहिमे अंतर्गत चोवीस प्रशासकीय विभागांतील ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्‍त्‍यांवर तसेच पदपथांवर दररोज विशेष स्वच्छता केली जात आहे. धूळ हटवण्यासाठी या रस्ते व पदपथांवर प्रारंभी ब्रशिंग करुन नंतर पाणी फवारणी केली जात आहे. ज्‍या रस्‍त्‍यांवर तसेच पदपथांवर अशी कार्यवाही करावयाची आहे, त्‍यांची निवड स्वतः विभाग कार्यालयांनी केलेली आहे. जिथे वाहनांची व नागरिकांची अधिक वर्दळ असते, अशा रस्ते व पदपथांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. (Air Pollution In Mumbai)

(हेही वाचा – BMC MLA Cars : महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांसाठी पाच टोयोटा इनोव्हा, पण इलेक्ट्रिक वाहनांचा विसर

New Project 35

‘या’ स्त्रोतांचा आधार घेत करणार रस्ते स्वच्छ 

रस्ते आदी स्वच्छतेसाठी आवश्‍यक सामग्री आणि संयंत्र आदींचा तपशीलवार आराखडा तयार केला जात आहे. पाणी टँकरची संख्या, प्रत्येक टँकर फेऱ्यांची वारंवारता आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा सर्वात जवळचा स्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखडयात करण्यात येत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा त्याचप्रमाणे विभागातील पाण्याचे स्थानिक स्रोत जसे की, तलाव, विहीर, कूपनलिका यामधील पाण्याचा वापर करुन रस्ते व पदपथ धुतल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची देखील काळजी घेतली जात असल्याचे जाधव यांनी नमूद केले. (Air Pollution In Mumbai)

महानगरपालिकेच्या उपाययोजना करताना, मुंबईकर नागरिकांच्‍या दैनंदिन जीवनमानात व्‍यत्यय येऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये (ऑफ-पीक अवर्स) मध्ये विशेषत: पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्‍ते धुण्‍याची कार्यवाही करण्यात येत आहे. तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात ही कार्यवाही केली जात आहे. रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहेत. त्यासाठी स्वच्छता करणाऱ्या वाहनांची संख्‍या वाढविण्‍यात येत आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मेट्रो, म्हाडा आणि इतर संबंधित संस्थांसमवेत समन्‍वय साधला जात आहे. रस्‍ते व पदपथ व एकूणच सर्व स्‍वच्‍छता कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे, असे चंदा जाधव यांनी स्पष्ट केले. (Air Pollution In Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.