रंजिय रॉय चौधरी यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३० रोजी बिहार राज्याच्या पटना शहरात झाला. (Ranjit Roy Chaudhary) प्रिन्स ऑफ वेल्स मेडिकल कॉलेज येथे त्यांनी वैद्यकशास्त्रातील पदवीचे शिक्षण घेतले. हे कॉलेज आता पाटणा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या नावाने ओळखले जाते. पुढे लिंकन कॉलेज ऑक्सफोर्ड येथून डीफीलची डॉक्टरेट डिग्री प्राप्त केली. त्यांनी १९५८ मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे प्रवेश घेतला. १९६० पर्यंत त्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. (Ranjit Roy Chaudhary)
त्यानंतर १९६४ मध्ये त्यांची पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च येथे फार्माकोलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी संस्थेचे डीन म्हणून काम पाहिले आणि पुढे ते संचालकपदावरही आरुढ झाले. त्यांनी पहिल्यांदा भारतात क्लिनिकल फार्माकोलॉजीमध्ये डीएम कोर्सची सुरुवात केली. (Ranjit Roy Chaudhary)
(हेही वाचा – BMC MLA Cars : महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांसाठी पाच टोयोटा इनोव्हा, पण इलेक्ट्रिक वाहनांचा विसर)
रंजित रॉय चौधरी आंतरराष्ट्रीय नैदानिक महामारी नेटवर्कच्या बोर्डाचे अध्यक्ष राहिले आहेत. २००८ ते २०१४ मध्ये ते इंद्रप्रस्थ मेडिकल कॉर्पोरेशनचे गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात सल्लागार झाले. त्याचबरोबर अपोलो हॉस्पिटल्स एजुकेशन ऍंड रिसर्च फाउंडेशनचे संशोधन टास्क फोर्सचे सदस्य देखील होते. (Ranjit Roy Chaudhary)
२०१३ मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे रंजित यांच्या अध्यक्षतेखाली औषध आणि वैद्यकीय परीक्षणांमध्ये दिशानिर्देशक तयार करण्यासाठी राष्ट्रीय समिती तयार करण्यात आली होती. त्यांना भारत सरकारने १९९८ मध्ये पद्यश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना भटनागर पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे. तसेच इतर अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. त्यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. (Ranjit Roy Chaudhary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community