अयोध्या येथील भव्य राम मंदिराचा (Ram Temple) लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारीला होणार आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात लोकार्पण अक्षतांचे वाटप करण्यात येणार आहे. विदर्भात १ ते १५ जानेवारीदरम्यान साडेदहा हजार गावातील पंधरा लाख घरी अक्षता देऊन लोकार्पणाचे निमंत्रण देण्यात येईल, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) (Vishwa Hindu Parishad) महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी शुक्रवारी दिली.
प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात असून लोकार्पण सोहळ्याचा दिवस जाहीर झाला आहे. त्या अंतर्गत विविध उपक्रमांची योजना श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे संपूर्ण देशभरात करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरला देशभरातील २०० कार्यकर्त्यांना श्रीराम जन्मभूमी मंदिरात पुजित अक्षता, प्रभू श्रीरामाचे छायाचित्र आणि माहिती पुस्तक देण्यात येणार आहे. या अनुषंगाने विदर्भ प्रांतातून विहिंपचे प्रांत सहमंत्री अमोल अंधारे आणि यवतमाळ विभाग मंत्री राम लोखंडे हे दोन पदाधिकारी अक्षता घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहेत.
(हेही वाचा – BMC MLA Cars : महापालिकेच्या चार अतिरिक्त आयुक्तांसाठी पाच टोयोटा इनोव्हा, पण इलेक्ट्रिक वाहनांचा विसर)
अयोध्येहून आणलेल्या अक्षतांचे २७ नोव्हेंबरला येथील पोद्दारेश्वर राम मंदिरात विधिवत पूजन करून विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुखांना देण्यात येतील. या अक्षता, श्रीरामाचे छायाचित्र आणि माहितीपुस्तक १ ते १५ जानेवारीदरम्यान श्रीराम जन्मभूमी मंदिर निधी समर्पण अभियान दरम्यान संपर्क केलेल्या साडेदहा हजार गावांतील १५ लाख घरी देऊन आमंत्रित करण्यात येईल, अशी माहिती गोविंद शेंडे यांनी दिली.
माझे गाव, माझी अयोध्या…संकल्पना
प्रत्येक व्यक्तीला अयोध्येला जाणे शक्य नाही. त्यामुळे २२ जानेवारीला माझे गाव, माझी अयोध्या ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत आपापल्या परिसरातील मंदिरात २२ जानेवारीला महाआरती, नामजप, संकीर्तन आदी धार्मिक उपक्रम राबवण्यात यावे.
हेही पहा –