MIDC fire: महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू, ४ कामगार बेपत्ता

घटनास्थळी रात्री 1 वाजता राज्याचे उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत भेट देणार आहेत.

155
MIDC fire: महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू, ४ कामगार बेपत्ता
MIDC fire: महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू, ४ कामगार बेपत्ता

रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील (Raigad Mahad MIDC fire) केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 7 कामगारांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, तर उर्वरित ४ कामगार अद्याप बेपत्ता आहेत. महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत (Blue Jet Healthcare company fire) आग लागली होती. त्यामध्ये 11 कामगार अडकले होते. गॅस गळतीमुळे (Gas leakage) आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची माहिती आहे.

ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगडमधील महाड MIDC मध्ये आहे. या कंपनीत सकाळी 11 च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचं असल्याचं लक्षात आलं. या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरू झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही, मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरू लागली. यामध्ये कंपनीतील काही कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

(हेही वाचा –Ram Temple: अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त साडेदहा हजार गावांत अक्षता वाटप )

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही या घटनेबाबत तात्काळ माहिती दिली. त्यामुळे पोलीसही घटना स्थळी दाखल झाले. या गॅसगळतीमुळे एका कामगाराची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. या आगीत ११ कामगार अडकले होते, तर ५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अडकलेल्या ११ कामगारांपैकी ७ जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे, तर इतर ४ जण बेपत्ता आहेत. या ठिकाणी अद्याप शोधकार्य सुरू आहे.

आग विझवली गेली आहे, पण आतील मशिनरी जोपर्यत थंड होत नाहीत तोपर्यत शोधणे फार कठीण आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाला बोलावण्यात आले आहे. ज्या प्लॅंट मध्ये स्फोट झाला, त्या प्लॅंटचे ट्रक्चर दबल्याने आत शोध पथकाला आत जाता येत नाही. शोधपथकाचं काम नेमकं कितपत झालं याची माहिती प्रशासनाकडून अधिकृतपणे मिळाली नाही. घटनास्थळी रात्री 1 वाजता राज्याचे उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत भेट देणार आहेत. अग्निशमन दलाच्या मदतीने वेळेत आग विझवण्यात आली. सध्या कंपनी नुकसानीच्या प्रमाणात मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. कंपनीकडे या प्लॅंटमधील मालमत्तेसाठी विमा संरक्षण आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.