Nepal Earthquake : भूकंपामुळे नेपाळ झाले उध्वस्त १२८ जणांचा मृत्यू ,आकडा वाढण्याची भीती

ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

129
Nepal Earthquake : भूकंपामुळे नेपाळ झाले उध्वस्त १२८ जणांचा मृत्यू ,आकडा वाढण्याची भीती
Nepal Earthquake : भूकंपामुळे नेपाळ झाले उध्वस्त १२८ जणांचा मृत्यू ,आकडा वाढण्याची भीती

नेपाळच्या जजारकोट जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने किमान १२८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.यामध्ये पश्चिम नेपाळमधील जजारकोट आणि रुकुम या जिल्ह्यांमध्ये एकूण ८०लोकांचा मृत्यू झाला असून १४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे नेपाळच्या दूरचित्रवाणीच्या प्रसारित झालेल्या वृत्तात सांगण्यात आले आहे. (Nepal Earthquake)

या झालेल्या भूकंपाचा परिणाम भारताची राजधानी नवी दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रापर्यंत (एन. सी. आर.) ८०० किलोमीटरहून अधिक (५०० मैल) दूरपर्यंत जाणवला. बिहारमधील पाटणा आणि मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी बचाव आणि मदतीसाठी ३ सुरक्षा एजन्सी तैनात केल्या आहेत. या भूकंपाचा प्रभाव उत्तर प्रदेशातील लखनौमध्येही दिसून आला, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळाले अनेक प्रभावित भागांशी संपर्क तुटल्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा : Madhya Pradesh : कुणाची सत्ता येणार? भाजपचे काय होणार? काय सांगते आकडेवारी?)

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता५.६ रिश्टर स्केल असून त्याची खोली ११ मैल इतकी होती. हुकुम पश्चिमचे मुख्य जिल्हा अधिकारी हरि प्रसाद पंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक घरे कोसळल्याने, हुकुम जिल्ह्यात किमान ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ३० जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.