लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण सुरू झाल्यामुळे (Onion Prices) कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील आठवड्यापासून लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समिती दिवाळी निमित्त बंद राहणार असल्याचे काही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे.
मागील काही दिवसांपासून (Onion Prices) कांद्याच्या दरात तेजी आली होती. कांद्याचे भाव पाच हजार रुपये प्रती क्विंटल पर्यंत गेले होते,त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातवरण होते. परंतु २८ ऑक्टोंबर रोजी केंद्र सरकारने वाढते भाव नियंत्रणात आणण्यासाठी कांद्याच्या निर्यातमूल्यामध्ये वाढ करत निर्यात मूल्य प्रति मेट्रिक टन ८०० डॉलर पर्यंत केल्याने (Onion Prices) कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
(हेही वाचा – Meditation : मेडिटेशन करण्याची सोपी पद्धत)
तसेच नाफेडने (Onion Prices) साठवणूक केलेला दोन लाख टन कांद्याची किरकोळ बाजारात २५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू झाल्याने त्याचा परिणाम देखील कांद्याच्या दरावर झाला आहे. चार दिवसांत कांद्याच्या दरामध्ये सरासरी ६०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार ३० ऑक्टोबर रोजी उन्हाळ (Onion Prices) कांद्याला सरासरी ४६००/- रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता तर गुरुवार २ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ४०००/- रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community