MLA Sada Sarvankar : आमदार सरवणकरांना श्री सिध्दीविनायक पावणार

287
MLA Sada Sarvankar : आमदार सरवणकरांना श्री सिध्दीविनायक पावणार

शिवसेनेचे माहिम दादर विधानसभेचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांची मंत्रीपदाची संधी हुकली असली तरी श्री सिध्दीविनायक आता त्यांच्यावर प्रसन्न होणार आहे. गणेशोत्सवातील दोन शिवसेनेच्या वादातील कारणामुळे हुकलेली मंत्रीपदाची संधी आता नव्या मार्गाने त्यांच्याकडे चालून येणार असून लवकरच त्यांची एका न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली जाणार आहे. हे अध्यक्षपद राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे आहे. त्यामुळे लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांनी पक्षात अनेक पदे भूषवली असून नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि आमदार, विभागप्रमुख अशी महत्वाची पदे त्यांनी भुषवली आहेत. सन १९९२ ते २००७ पर्यंत ते नगरसेवक होते, तर २००४मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ते दादरमधून आमदार म्हणून प्रथम निवडून आले. त्यानंतर झालेल्या २००९च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे सदा सरवणकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. या निवडणुकीत मनसेचे नितीन सरदेसाई यांची लॉटरी लागली. परंतु त्या दरम्यान सन २०१२मध्ये काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याने सरवणकर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. त्याच दरम्यान माहिम दादर विधानसभेत शिवसेना कमजोर होत असल्याने या परिस्थितीत सदा सरवणकरच पक्षाला सावरु शकतात हे पाहून पक्षाने त्यांच्यावर विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर सन २०१४ व त्यानंतर २०१९ मध्ये ते (MLA Sada Sarvankar) सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. परंतु जुलै २०२२मध्ये शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये सदा सरवणकरही सामील झाले.

(हेही वाचा – Maratha reservation : अंतरवालीतील सभास्थानामुळे नुकसान झालेल्या ४४१ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यानी दिली ‘ही’ भेट)

शिवसेनेचे सर्वांत ज्येष्ठ आणि महापालिकेत तीन वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार बनलेल्या (MLA Sada Sarvankar) सदा सरवणकर यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांच्याकडे शहराचे पालकमंत्री देण्याचा विचार होता. परंतु मागील गणेशोत्सवात दोन शिवसेनेत झालेल्या राड्यामध्ये बंदुक प्रकरण घडले आणि सदा सरवणकर यांचे हे स्वप्न भंग पावले.

परंतु आता शिवसेनेनेही त्यांचा यथोचित सन्मान राखण्याचा निर्णय घेतला असून त्यांची श्री सिध्दीविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. श्री सिध्दीविनायक न्यासाच्या विद्यमान कार्यकारणीचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे न्यासाच्या अध्यक्षपदी सदा सरवणकर यांची वर्णी लावून लवकरच यावर कार्यकारीणी जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या न्यासाच्या अध्यक्षपदी सध्या उबाठा शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांची नियुक्ती झाली होती, तर कोषाध्यक्ष म्हणून संजय सावंत होते. तर विश्वस्त म्हणून विशाखा राऊत, सुबोध आचार्य, वैशाली पाटणकर, आरती साळवी,सुनील पालवे, सुनील गिरी,राजाराम देशमुख, भास्कर शेट्टी, श्वेता अवर्सेकर आदींचा समावेश होता. या कार्यकारणीची कालावधी जुलै २०२३मध्येच संपुष्टात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणामुळे ही नियुक्ती लांबणीवर पडली होती, परंतु आता लवकरच याची याची घोषणा केली जाणार आहे. हे पद राज्यमंत्रीपदाच्या दर्जाचे असल्याने एकप्रकारे न्यासाचे अध्यक्षपद देऊन सदा सरवणकर यांचे समाधान आणि सन्मान करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होणार आहे. (MLA Sada Sarvankar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.