ऋजुता लुकतुके
भारतीय संघ शुक्रवारी (३ नोव्हेंबर) संध्याकाळी आपल्या (Ind vs SA) दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या साखळी सामन्यासाठी कोलकातामध्ये दाखल झाला. भारताने उपान्त्य फेरीत पूर्वीच प्रवेश नक्की केला आहे. पण, द आफ्रिकेबरोबरची लढतही महत्त्वाची आहे. कारण, भारताबरोबरच या स्पर्धेत अवर्णनीय फॉर्ममध्ये असलेला दुसरा संघ आहे तो दक्षिण आफ्रिकेचा. अशा संघाबरोबर खेळताना भारतीय संघ विजयी धडाका कायम ठेवू शकतो का याचा फैसला कोलकातामध्ये होणार आहे.
काहीजण तर या सामन्याचं वर्णन अंतिम फेरीची रंगीत तालीम असंच करत आहेत.
#WATCH | West Bengal: Indian Cricket team arrived in Kolkata ahead of their match against South Africa on 5th November at Eden Gardens #ICCCricketWorldCup23 pic.twitter.com/DlmiGEVagF
— ANI (@ANI) November 3, 2023
एरवी भारतीय फलंदाजी आणि प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी असा मुकाबला रंगत असतो. पण, पहिल्यांदा (Ind vs SA) आफ्रिकन फलंदाजी विरुद्ध भारतीय गोलंदाजी असा मुकाबला रंगताना ईडन गार्डन्सवर दिसणार आहे. कारण, आतापर्यंत या स्पर्धेत आफ्रिकन संघाने तीन वेळा तीनशेची धावसंख्या ओलांडली आहे. आणि एकाबाजूने बळी गेले तरीही त्यांचे फलंदाज चौकार आणि षटकार वसूल करण्यात यशस्वी होत आहेत. त्याच्या जोरावर विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आफ्रिकन संघाने केला आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : महायुतीमधील समन्वय अधिक वाढायला हवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा)
अशावेळी (Ind vs SA) जसप्रीत बुमराह, महम्मद सिराज आणि महम्मद शामी यांचं यशस्वी तेज त्रिकुट बवुमा, डी कॉक, व्हॅन देअर ड्युसेन यांच्यासमोर कशी कामगिरी करतं याची उत्सुकता सगळ्यांना असणार आहे. भारतीय संघ उशिरा कोलकाता येथे पोहोचल्यामुळे संघाने हॉटेलमध्येच आराम करणं पसंत केलं आहे.
पण, प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र जातीने ईडन गार्डन्स मैदानावर जाऊन खेळपट्टी पाहून आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community